Tuesday, July 28, 2026
Home बॉलीवूड काम मागायला कसली लाज! ‘या’ अभिनेत्याने ट्विट करत केली काम देण्याची विनंती

काम मागायला कसली लाज! ‘या’ अभिनेत्याने ट्विट करत केली काम देण्याची विनंती

मनोरंजनविश्वात नेहमीच उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. या क्षेत्रात आज तुमच्याकडे काम असेल, मात्र उद्या असेलच याची ग्यारंटी कोणीच देऊ शकत नाही. अनेक मोठे आणि प्रभावी कलाकार देखील अनेकदा काम नसल्यामुळे घरी बसलेले पाहायला मिळते. अशातच आता सोशल मीडिया आल्यामुळे अनेक कलाकार यावर पोस्ट टाकत काम मागताना दिसतात. यातच आता अजून एका कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट टाकत मनोरंजनविश्वातील लोकांमध्ये काम मागितले आहे.

‘स्कॅम 1992’ अभिनेता हेमंत खरेने ट्विटरवर ट्विट करत काम मागितले आहे. मागील अनेक काळापासून कामाच्या शोधात असणाऱ्या हेमंतने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत काम देण्याची विनंती केली आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, “सर्व लेखक, दिग्दर्शक, कास्टिंग दिग्दर्शक आणि क्रिएटर्सला नम्र विनंती आहे की, कृपया मला तुमच्या कथा, चित्रपट, सिरीज, शॉर्ट फिल्मस मध्ये भूमिका देण्यासाठी विचार करा. मी एक अभिनेत्याच्या रूपाने स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी उत्सुक आहे.” या पोस्टसोबत त्याने हात जोडलेला एक ईमोजी देखील टाकला आहे.

हेमंत खरेने अजून एक ट्विट करत त्यात लिहिले, “असे करण्यासाठी खूपच विचार केला आणि हिंमत गोळा केली. मात्र जसे माझ्या सर्वच सिनियर्स आणि गुरूंनी सांगितले आहे की, “काम मागण्यासाठी कसली लाज”! यासाठीच जे मला जाणवले तेच मी व्यक्त केले. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी, सल्ल्यांसाठी आणि रिट्वीटसाठी मी आभारी आहे. धन्यवाद.”

हेमंतच्या या ट्विटवर अनेक कमेंट्स येत असून, यातच ‘रनवे 34’ आणि ‘भोला’ सिनेमाचे लेखक असणाऱ्या आमिल कियाल खान यांनी ‘नोटेड’ असे ट्विट केले आहे. हेमंत खरेने अनेक चित्रपटांमध्ये आणि वेबसेरीजमध्ये काम केले असून, तो सलमान खान प्रॉडक्शनच्या ‘नोटबुक’ सिनेमात मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसला होता. यासोबतच तो बॉबी देओलच्या ‘लव हॉस्टेल’ आणि ‘आझाद’ या गुजराती सिरीजमध्ये झळकला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘शांती’ मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंदिराने क्रिकेट अँकरिंग करत मिळवली होती तुफान वाहवा

HAPPY BIRTHDAY : ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये रघुरामला केले होते रिजेक्ट, ८ वर्षांनंतर मिळवला गायनाचा मोठा पुरस्कार

हे देखील वाचा