Friday, July 5, 2024

फक्त २० सेकंदात कितीतरी गौहर खान म्हटलेय सॉरी, कारणचंही आहे तसंच वेगळं

अभिनेत्री गौहर खानने नुकतंच तिचा पती झैद दरबारसोबत, लग्नानंतरची पहिली ईद साजरी केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. अभिनेत्री बऱ्याच लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमामध्ये दिसली आहे. गौहर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती एका नवीन व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

वास्तविक, गौहर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे, ती यात सतत सॉरी बोलताना दिसत आहे.

खरं तर या व्हिडिओमध्ये गौहर पती झैद दरबारसोबत दिसली आहे. रस्त्यावरच मीडिया या जोडप्याला घेरते आणि फोटोसाठी पोज द्यायला सांगते. तेव्हा ती त्यांना सॉरी बोलून, पतीसोबत पुढे जायचा प्रयत्न करते. मात्र तरीही फोटोग्राफर तिला थांबण्याची विनंती करतात. हे पाहून गौहर त्यांना सतत सॉरी बोलत राहते व पती झैदचा हात पडकून निघून जाते.

हा व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. “गौहर खान यात किती वेळा सॉरी बोलत आहे?” असा प्रश्न या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विचारला गेला आहे. ज्यावर युजर्स आता जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह असून क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, गौहर खानविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याशिवाय गौहर खानच्या या निष्काळजी वृत्तीमुळे, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) ने दोन महिने तिच्यावर बंदी घालण्याचा निर्णयही घेतला होता.

हे देखील वाचा