Thursday, July 31, 2025
Home मराठी ‘पापण्यांची तोरणं…’ गाण्यावर मुलीने सादर केली झक्कास लावणी; डान्स स्टेप्सने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

‘पापण्यांची तोरणं…’ गाण्यावर मुलीने सादर केली झक्कास लावणी; डान्स स्टेप्सने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

सध्याच्या काळात अधिकतर लोकं सोशल मीडियावर वेळ घालवणे पसंत करतात. अशामध्ये दरदिवशी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जातात. यातील ठराविक व्हिडिओ किंवा फोटो असे असतात जे युजर्सचे लक्ष वेधून घेतात आणि बघता बघताच अशा पोस्ट व्हायरल होऊ लागतात. असाच एक व्हिडिओ आज काल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. याचे व्हायरल होण्यामागचे कारण असे आहे की, एक मुलगी यात ‘पापण्यांची तोरणं…’ या गाण्यावर अतिशय उत्तमरीत्या लावणी करताना दिसत आहे. लावणी करतानाचे तिचे हावभाव आणि स्टेप्सने  नेटकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधलेले पाहायला मिळत आहे. साध्या लूकमध्येही तिने सर्वांना आकर्षित केले आहे.

https://www.facebook.com/watch/?v=533205167850095

लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. ढोलकीचा आवाज कानावर पडल्यावर, मराठी माणसाचे पाय जागेवरच थिरकू लागतात. महाराष्ट्रात लावणीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतर कोणत्याही काव्य किंवा साहित्यप्रकारापेक्षा लावणी ही आपली अंगभूत सोपेपणा, ठसकेबाजपणा, चटकदार बाज आणि चटपटीत शब्दरचना यामुळे सामान्य लोकात लोकप्रिय झाली. अस्सल मराठी वळणाचा लोकप्रिय प्रकार म्हणून ‘तमाशा’ महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत, त्या मुलीच्या नृत्याला नेटकऱ्यांची पसंती मिळणे साहजिकच होते.

चर्चा तर होणारच या फेसबुक पेजवरून पोस्ट झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. अवघ्या ३० सेकंदाच्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून सतत पाहिलं जातंय. तसेच, युजर्स कमेंट्सच्या माध्यमातून त्या मुलीचे कौतुक करत आहेत, तिला प्रोत्साहन देत आहे. त्याचवेळी काही युजर्सचे म्हणणे आहे की, ही लावणी योग्य वेशभूषा करून अधिक चांगली वाटली असती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा