Wednesday, July 3, 2024

‘डान्सिंग डॅड’ रिकी पाँडने केला सलमान खानच्या ‘या’ गाण्यावर डान्स, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. लॉकडाऊन दरम्यान अनेक स्टार्स त्यांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अशातच इंटरनेट स्टार रिकी पॉंड हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे मजेशीर व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. त्याचे व्हिडिओ बघून सगळ्यांचेच घर बसल्या मनोरंजन होत असतो. त्याने या आधी देखील अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने डान्स करताना दिसत असतो. ‘डान्सिंग डॅड’ रिकी पाँड हा एक विदेशी व्यक्ती आहे. तो बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक गाण्यांवर व्हिडिओ बनवत असतो. अशातच रिकीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

वुम्पलाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रिकीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रिकी याने सलमान खान प्रमाणे या व्हिडिओमध्ये डान्स केला आहे. प्रेक्षक आता सलमान खान आणि रिकीच्या डान्सची तुलना करत आहेत.

अनेकांनी त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करून त्याच्या डान्सचे कौतुक केले आहे, तर अनेकजण म्हणत आहेत की, सलमान खान पेक्षाही त्याने खूप चांगला डान्स केला आहे. काहींनी तर सलमान खानला त्याच्याकडून डान्स शिकण्याचा सल्ला देखील दिला आहे.

रिकी हा बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. त्याचा कोणताही व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत असतो. त्याचे हे सातत्याने व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये खूप वाढ झाली आहे. एक विदेशी व्यक्ती असूनही त्याला बॉलिवूड गाण्यांबद्दल खूप प्रेम आहे. त्याने तो अनेक गाण्यांवर व्हिडिओ करून त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, ‘खड तैनू मैं दस्सा’ गाण्यावरील नेहा कक्करचे एक्सप्रेशन्स पाहून युजरची कमेंट

-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा