Friday, July 5, 2024

‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेत्री अंजली बरोटने बांधली बॉयफ्रेंड गौरव अरोरासोबत लगीनगाठ, पाहा लग्नाचा ‘खास’ अल्बम

आजपर्यंत आपण अनेक सिझन (हंगाम) पाहिले आहेत. जसे की, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आयपीएल आणि बरेच… परंतु सिनेसृष्टीमध्येही एक सिझन सध्या जोरात सुरू आहे, तो म्हणजेच लग्नाचा. नुकतेच बॉलिवूडची अभिनेत्री दिया मिर्झाने उद्योजक वैभव रेखीसोबत लग्न केले. आता अशातच आणखी एका अभिनेत्रीने लगीनगाठ बांधली आहे. मागील वर्षी रिलीझ झालेल्या ‘स्कॅम १९९२’ वेब सीरिजमधील अभिनेत्री अंजली बरोटने बॉयफ्रेंड गौरव अरोरासोबत मंगळवारी (१६ फेब्रुवारी) लग्न केले. त्यांच्या या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.

अंजलीने ‘स्कॅम १९९२’ वेब सीरिजमध्ये स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताच्या पत्नीची म्हणजेच ज्योतीची भूमिका साकारली होती. तिची या भूमिकेची चोहोबाजूंनी प्रशंसा करण्यात आली. आता अंजली लग्नबंधनात अडकली आहे. अशामध्ये तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. अंजलीचे हे फोटो चाहत्यांना भलतेच आवडले आहेत.

अंजली बरोटने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या प्री-वेडिंगपासून ते लग्नाच्या विधींपर्यंत सर्व फोटोंचा समावेश आहे. लग्नाच्या या फोटोंमध्ये अंजली आणि गौरव खूपच सुंदर दिसत आहेत. लग्नाच्या दिवशी अंजलीने पीच रंगाचा लेहंगा घातला होता, तर गौरवनेही फिक्कट गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. यासोबतच दोघांनीही गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची वरमाळा एकमेकांना घातली होती.

यापूर्वीही अंजलीने आपल्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. मंगळवारी आपल्या लग्नाच्या दिवशी गौरवसोबत ती कॅज्युअल ड्रेसमधील आपला फोटोही शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले होते की, “जर जोखीम असेल तर प्रेम आहे (रिस्क है, तो इश्क है।).”

अंजली आणि गौरवच्या लग्नाच्या अल्बमवर चाहत्यांनी जोरदार पसंती दर्शवली आहे. या फोटोंमध्ये मेहंदीच्या कार्यक्रमापासून ते मंगळसूत्र घालतानापर्यंतचे सर्व फोटो आहेत.

अंजली आणि गौरवला टीव्हीजगतातून, तसेच सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…आणि रत्नागिरीत जन्म झालेल्या महाराष्ट्र कन्येने गाजवले टॉलीवूड, दिले असंख्य सुपर हिट सिनेमे

-नववधू मानसी नाईकचे नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात फोटोशूट, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

-तमिळ अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोशूटने कियारा आडवाणीलाही टाकले मागे; फोटो होतायत जोरदार व्हायरल

हे देखील वाचा