Saturday, July 6, 2024

‘लांबून ऐश्वर्या राय, तर जवळून दिसते राखी सावंत’, अभिनेत्रीचे बोलणे ऐकून तुम्हालाही आवरणार नाही हसू

‘बिग बॉस १४’ मध्ये सहभागी झाल्यानंतर राखी सावंत सतत चर्चेत असते. व्यावसायिक आयुष्यापेक्षा अधिक ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येते. याशिवाय राखी अनेकदा मीडियाशी बोलतानाही पाहिली जाते. मीडियाशी संवाद साधतानाचे तिचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

अलीकडेच राखी पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधताना कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी तिचे बोलणे ऐकून तुम्हीही हसू आवरू शकणार नाहीत. वास्तविक राखी कॉफी खरेदी करण्यासाठी, मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळाली. त्यावेळी एक चाहता लांबून तिच्यासोबत सेल्फी क्लिक करू लागला, तेव्हा राखी म्हणते, “लांबूनच मी चांगली दिसते. लांबून पाहिल्यावर मी ऐश्वर्या राय दिसते आणि जवळून पाहिल्या राखी सावंत दिसते.”

या व्हिडिओवर नेटकरी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आजकालच्या तणावाच्या वातावरणात, राखी अशाप्रकारे विनोद करून सर्वांचे मनोरंजन करतेय, हे पाहून बरेच जण तिचे कौतुकही करत आहेत.

महाराष्ट्राला तौक्ते वादळाचा फटका बसल्यानंतर, मुंबईत सर्वत्र बरेच नुकसान झाले आहे. या वादळामुळे राखी सावंतलाही मोठी डोकेदुखी सहन करावी लागली. राखीच्या बाल्कनीचे छत या चक्रीवादळाने उडविले. ती जेव्हा कॉफी घेण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर आली, तेव्हाच तिने याबद्दलही सर्वांना सांगितले.

तौक्ते चक्रीवादळामुळे ११४ किमी/ताशी वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार पावसाने मुंबईतील सर्व लोकांना चिंतेत पाडले. अक्षय कुमार ते मलायका अरोरा, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू सिंग या कलाकारांच्या बंगल्याच्या बाहेर, विध्वंस झाल्याचे धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. बऱ्याच ठिकाणी जागोजागी झाडे तुटून पडलेली आहेत दिसली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जीना नहीं मुझे हैं मरना’, म्हणत छतावर केला कुणाल खेमूने डान्स, मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-खुशी कपूर झाली घराबाहेर स्पॉट अन् सगळीकडे होऊ लागली तिच्या वॉलपेपरची चर्चा, पाहून तुम्हीही व्हाल भावुक

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

 

हे देखील वाचा