Tuesday, June 10, 2025
Home अन्य धडधड वाढते ठोक्यात!! प्रिया प्रकाशचे फोटोशूट पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

धडधड वाढते ठोक्यात!! प्रिया प्रकाशचे फोटोशूट पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

प्रिया प्रकाश वारियर जितकी सक्रिय सिनेमाच्या जगात आहे, तितकीच ती सोशल मीडियावरही असते. प्रिया नुकतीच रशियाहून भारतात परतली आहे. रशियामध्ये तिने मित्रांसोबत मजा केली आणि तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण केले आहे. मात्र, अलीकडेच प्रियाची मैत्रीण आणि स्टायलिस्ट गायूने ​​तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. तिचे हे फोटोशूट पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

प्रिया प्रकाशने हे फोटोशूट डार्क लाईटमध्ये केले आहे. याचदरम्यान या फोटोशूटमध्ये प्रिया प्रकाश पोझ देत आहे आणि अल्ट्रा ग्लॅम स्टाईलमध्ये दिसून येत आहे. अशाप्रकारे चाहते तिच्या या फोटोशूटला पसंती देत ​​आहेत आणि कमेंट देखील करत आहेत. (Seeing Priya Prakash’s photo, the fans were impressed)

मागील काही दिवसांपूर्वीच क्राईम-थ्रिलर ‘लव्ह हॅकर्स’ या चित्रपटाचे रशियात चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटात प्रिया मुख्य भूमिका साकारणार आहे. सायबर गुन्ह्यांशी संबंधित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात प्रिया सायबर गुन्हेगारांचा बळी ठरते आणि मग ती त्यांच्याशी कशाप्रकारे लढते या सर्व गोष्टी यात दाखवल्या आहेत. अशाप्रकारे, प्रियाच्या चाहत्यांना चित्रपटात तिला एका वेगळ्या रूपात लवकरच पाहायला मिळणार आहे.

प्रिया २०१८ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सोशल मीडिया सेन्सेशन बनली होती. प्रियाच्या एक डोळा मारण्याच्या हावभावाने सर्वांचे मन जिंकले होते. अनेक चाहत्यांच्या ह्रदयावर तिने राज्य केले आहे. प्रिया नुकतीच ‘चेक’ या चित्रपटात दिसली होती. याचे दिग्दर्शन चंद्रशेखर येलेती यांनी केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत नितीन आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसले होते.

आता चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. प्रियाचा हा चित्रपट कसा असेल हे, पाहण्यासारखे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा