Monday, July 1, 2024

“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच

बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत सीमा पाहवा यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. अशात अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतःबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. संवादादरम्यान अभिनेत्रीला विचारण्यात आले की, ‘त्या धूम्रपान करतात का?’ या प्रश्नावर त्यांनी खूपच मजेशीर उत्तर दिले. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

अभिनेत्री सीमा पाहवा (seema pahwa) म्हण्याल्या की, “मी धूम्रपान करत नाही, पण धूम्रपान करणाऱ्या मुली मला आवडतात. मुलींच्या हातात सिगारेट इतकी छान का दिसते ते मला कळत नाही. जेव्हा त्या स्मोकिंग करताना बोलतात तेव्हाचे व्हिज्युअल मला आवडते. त्यांच्या आवाजातही बदल हाेताे. मला मुलींच्या हातातली सिगारेट आवडते.”

या संभाषणात अभिनेत्रीने पुढे सांगितले की, ‘याच कारणामुळे त्यांनी पर्समध्ये सिगारेटची पाकिटे ठेवण्यास सुरुवात केली.’ अभिनेत्री म्हणाली, “त्या काळात सिगारेटला लवंगीचा वास येत होता. म्हणून मी त्याचे पॅकेट ठेवायला सुरुवात केली, जेणेकरून मी पर्स उघडल्यावर लोकांना वाटेल की, हो त्यात काहीतरी आहे. मात्र, मी ते ओढत नव्हते. म्हणून मी ते वाटून द्यायची. होय, मी एकदा सिगारेट ओढून पाहिली. मात्र, मला त्यात मजा आली नाही .

अभिनेत्रीने मनाेज पाहवा यांच्यासाेबत बांधली लग्नगाठ
सीमा पाहवा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बाेलायचे झाले, तर त्यांनी आणि अभिनेता मनोज पाहवा यांनी 1984 मध्ये टीव्ही शो ‘हम लोग’ मधून पदार्पण केले होते, ज्यानंतर या जाेडप्यानी 1988 मध्ये लग्न केले. यानंतर अभिनेत्रीने ‘बधाई दो’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘दम लगा के हईशा’ ‘ऑंखाे देखी’ यासारख्या अनेक चित्रपटात छाेट्या-माेठ्या भूमिका साकारल्या.(seema pahwa recalled carrying a packet of cigareete to appear cool)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुष्मिता दिसली एक्स बाॅयफ्रेंडसाेबत, व्हिडिओ व्हायरल

करोडोंच्या फसवणुकीचा आरोप असलेल्या सुकेशवर बनणार बॉलिवूड चित्रपट, जॅकलिन साकारणार मुख्य भूमिका?

हे देखील वाचा