Monday, July 1, 2024

‘मला कशाचीही पर्वा नाही…’, 24 वर्षांचा संसार मोडत स्पष्टच बोलली सोहेल खानची एक्स पत्नी

एकीकडे अभिनेता सलमान खान हा अविवाहित आहे. मात्र, त्याच्या दोन्ही भावांचे लग्न झाले आहे. मात्र, अरबाज खान याचे अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याशी घटस्फोट झालाय. अरबाजनंतर सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान यानेही काही महिन्यांपूर्वी पत्नी सीमा सजदेह हिच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोघांनीही 1998मध्ये लग्न केले होते. आता त्यांचा 24 वर्षांचा संसार मोडत असल्याने प्रत्येकजण हैराण झाला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सीमाने घटस्फोटाचे कारण सांगितले.

सोहेलपासून घटस्फोट का घेतेय सीमा?
कोणत्याही व्यक्तीसाठी संसार मोडणे किती कठीण असते, याचा अंदाज लावणेही कठीण आहे. कदाचित असेच काहीसे, सोहेल खान (Sohail Khan) आणि सीमा सजदेह (Seema Sajdeh) यांच्यासाठीही राहिले असावे. अनेक काळापासून सोहेल आणि सीमाच्या घटस्फोटाबद्दल चर्चा होत आहे. यावर जोडप्यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. अशात माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सीमाने तिच्या आयुष्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल चर्चा केली.

सोहेलसोबतच्या घटस्फोटावर सीमा म्हणाली की, “जर मला याबद्दल विचारच करायचा असता, तर मी केला असता. ही खूप काळोखाची जागा आहे, ज्यामध्ये तुम्ही आरामात हरवून जाऊ शकता. मात्र, मी दुसरीकडे राहणे योग्य समजले. हीच गोष्ट मला आयुष्यात पुढे घेऊन जाते.”

‘कुणाचीही परवा नाही’
तिच्या आयुष्याबद्दल बोलताना सीमा पुढे म्हणाली की, “तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, भाऊ-बहीण, कोणीही तुम्हाला असे पाहू शकणार नाही. बहीण किंवा मुलीला असे पाहू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला त्या व्यक्तीची सतत काळजी असते. यामुळेच मी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली आहे. मी माझ्यातील सर्व नकारात्मकता काढून टाकली आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sohail Khan (@sohailkhanofficial)

“आता मी माझ्या आयुष्यात अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे मला कशाचीही पर्वा नाही. लोकांना सीमा कोण आहे, हे माहीत आहे. माझे कुटुंब कोण आहे? माझे आई-वडील, मुले, भावंडं आणि आजूबाजूच्या लोकांनाही मी कोण आहे, हे माहीत आहे,” असेही सीमा म्हणाली. सीमा पुढे म्हणते की, “मी स्वतःशी खरेपणाने वागणार आहे. माझ्याकडे शून्य फिल्टर आहे.”

सीमाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती एक फॅशन डिझायनर आहे. 2 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर तिचा ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाईव्ज’ या शोचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सेक्स क्लिपनंतर पूनम पांडेसोबत दिसली ‘कच्चा बदाम’ गर्ल; नेटकरी म्हणाले, ‘आता दोघी एमएमएस…’
शाहरुख खानच्या चित्रपटात झळकणार होती आलिया, परंतु ‘या’ कारणामुळे दिला नकार
‘…पण कधीही हिम्मत नाही झाली’, हेमांगी कवीने सांगितला ताज हॉटेलमधील तिचा भन्नाट अनुभव

हे देखील वाचा