Sunday, September 8, 2024
Home मराठी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन! अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केल्या भावना…

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन! अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केल्या भावना…

मराठी चित्रपटसृष्टी तसेच नाट्यसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे आज निधन झाले आहे. गेली कित्येक दशके आपल्या कामातून त्यांनी प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. मागील काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने मराठी कलाक्षेत्राने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी यावर दुःख व्यक्त केलं आहे. 

प्रशांत यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. ते म्हणतात, ही धक्कादायक बातमी आहे. तो आजारी नक्की होता पण इतक्या लवकर जाईल असं वाटलं नव्हतं. अगदी काल-परवा पर्यंत आम्ही भेटत बोलत होतो. १९८३ साली मी टूर टूर नाटकात पहिल्यांदा काम केलं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची जोडी सुपरहिट  होती. या दोघांना बघतच आम्ही शिकलो. विजय कदम हे जबरदस्त काम करायचे. त्यांची प्रतिक्रिया देण्याची स्टाईल छान होती. सहकलाकारांना ते चांगला सपोर्ट करायचे खूप लवकर गेला तो. हि घटना फारच दुःखद आहे. अशा हळव्या शब्दांत प्रशांत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

पुढे प्रशांत विजय कदम यांच्या बरोबरच्या आठवणी सांगतात; ‘माझ्या पहिल्या सिनेमात मी त्यांच्यासोबत काम केलं होतं. नाटकात आपण ज्याप्रकारे प्रतिक्रिया देतो तशा सिनेमात द्यायच्या नसतात. हे त्यांनी मला समजावून सांगितलं होतं.’ 

विजय कदम गेली कित्येक दशके प्रेक्षकांचं विविध माध्यमांतून मनोरंजन करत होते. नाटक, चित्रपट, जाहिराती अशी चौकस कामे त्यांनी केली. विजय कदम यांनी १९८०- ९० च्या काळात रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. सही रे सही, विच्छा माझी पुरी करा, टूर टूर हि त्यांची विशेष नोटेबल कामे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

‘हम आपके है कौन’ होणार पुन्हा प्रदर्शित, चित्रपटाच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त जुन्या आठवणी होणार ताज्या

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा