Tuesday, August 5, 2025
Home अन्य ‘ये रिश्ता क्या केहलाता हैं’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मॉडर्न अवतारातील ग्लॅमरस फोटो व्हायरल

‘ये रिश्ता क्या केहलाता हैं’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मॉडर्न अवतारातील ग्लॅमरस फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील मालिका ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेने खूप प्रसिद्धी मिळवली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेमध्ये आजवर अनेक कलाकार आले आणि गेले, मात्र अजूनही लोकं त्यांना विसरलेली नाही. मालिकेच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या नैतिकच्या आईची भूमिका साकारणार्‍या सोनाली वर्मा यांनी त्यांचं चांगलाच प्रेक्षकवर्ग तयार केला होता. त्यांनी काही वर्षांनी मालिका तर सोडली मात्र त्यांना रील आणि रियल लाईफमध्ये नैतिकची आई ही नवीन ओळख मिळाली. सोनाली यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मालिकेत पारंपरिक पेहरावात दिसलेल्या सोनाली प्रत्यक्षात मात्र खूपच मॉडर्न आहे. अलीकडेच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये त्यांचा मॉडर्न लूकने चाहत्यांना मोहित करत असून, त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

हिंदी मालिकांमधील ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री सोनाली वर्मा सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहे. मालिकेत पारंपरिक पेहरावात असणाऱ्या सोनाली यांचा हा नवीन लूक त्यांच्या फॅन्सला खूपच आवडत आहे. सोनाली यांच्या मॉडर्न लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

सोनाली फारश्या सोशल मीडियावर सक्रिय नसतात. त्यामुळे खुप दिवसांनी सोनाली यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सोनाली ‘ये रिश्ता क्या केहलाता है’च्या सेटवर असल्याचे दिसत आहे. याचबरोबर सोनालीने वेस्टर्न लूकमधील फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

तत्पूर्वी ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेत सोनाली यांनी गायत्री सिंघानियाची म्हणजेच हिना खानच्या अक्षराच्या सासूची भूमिका साकारली होती. या प्रेमळ सासू सुनेच्या जोडीला प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली होती. सोनाली दीर्घकाळ मालिकांमध्ये दिसल्या नसल्या तरी आजही तिच्या चाहत्यांना त्यांना पुन्हा टीव्हीवर पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे.

दरम्यान, ४६ वर्षीय सोनालीने ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेद्वारे त्यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली. ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ व्यतिरिक्त सोनाली यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘कुमकुम भाग्य,’ ‘दिया और बाती हम’,’ तारक मेहता का उलटा चश्मा’ अशा प्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-मोठा भाऊ घरी येण्याच्या बातमीने अबराम खान झाला भलताच खुश, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘अशी’ होती जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया, वाचा कर्मचाऱ्यांसह कैद्यांना काय म्हणाला?

हे देखील वाचा