Wednesday, July 3, 2024

नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. मालिका प्रेक्षकांना प्रचंड पसंतीस पडत आहे. या मालिकेतील पात्र देखील चांगलीच गाजली आहेत. या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ही मालिका सुरु झाल्यापासून नेटकऱ्यांनी या मालिकेवर अनेक मीम्स बनवले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात खिल्ली देखील उडवली आहे. अशातच या मालिकेतील दोन सीन समोर आले. एकमेकांशी संबंध असणारे हे दोन चुकीचे शूट झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या मालिकेची चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमध्ये नुकतेच ओम आणि स्वीटूचा साखरपुडा झाला आहे. यावेळी स्वीटूने लाल रंगाची साडी नेसलेली दाखवली आहे. ज्यावेळी मालविका तिला साडीबाबत विचारते तेव्हा ती म्हणते की, “हा माझ्या आईच्या लग्नातला शालू आहे. तिने तो मला आशीर्वाद म्हणून दिला आहे.” तर याच मालिकेतील एक आधीचा सीन दाखवला आहे. जेव्हा स्वीटूचे कुटुंब मालविकाच्या घरी गेलेले असते. तेव्हा स्वीटूच्या आईने म्हणजेच नलूने एक लाल रंगाची साडी नेसलेली असते. जेव्हा मालविका तिला साडीवरून बोलते तेव्हा ती म्हणते की, “हा माझ्या लग्नातील शालू आहे. तुमच्याकडे यायचं म्हणून मुद्दाम घातली आहे.” या दोन्ही व्हिडिओमधील साडी वेगळी आहे. मालिकेतील हे सीन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. तसेच नेटकरी या व्हिडिओची खिल्ली उडवत आहे. (yeu kashi tashi mi nandayala serial’s seen troll on social media)

या मालिकेत ओम आणि स्वीटूचे पात्र अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर निभावत आहेत. मालिकेतील त्या दोघांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. पण आता त्यांच्या लग्नात मालविका कायतरी विघ्न नक्कीच आणेल. त्यामुळे आता मालिकेचे आगामी एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा