Wednesday, June 11, 2025
Home टेलिव्हिजन ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ मालिकेच्या सेटला आग, याच ठिकाणी झाला होता अभिनेत्री तुनिशा शर्माचा मृत्यू

‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ मालिकेच्या सेटला आग, याच ठिकाणी झाला होता अभिनेत्री तुनिशा शर्माचा मृत्यू

‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ ही मालिका तुनिशा शर्मा आत्महत्येमुळे खूपच गाजली. नुकतीच या मालिकेचा सेट असलेल्या पालघरमधील भजनलाल स्टुडिओला आग लागल्याची घटना समोर आली आहे. १२ मे रोजी या स्टुडिओला आग लागायचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान याच सेटवर डिसेंबर महिन्यात अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली होती. या आगीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहे.

याच भजनलाल स्टुडिओमध्ये शिजान खान आणि तुनिशा शर्मा तिच्या मृत्यूपूर्वी शूटिंग करत होते. मीडियामधील माहितीनुसार मुंबईच्या बाहेरील भाग असलेल्या वसई आणि विरार भागातील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ११ मे ला रात्री ही आग लागली त्यानंतर १२ मे ला पहाटे अधिकाऱ्यांना ही आग विझवायला यश आले आहे. अजून तपास सुरु असून, नक्की ही आग का लागली याचा शोध सुरु आहे.

दरम्यान तुनिशा शर्मा मृत्यू केसमध्ये शिजान खानला कोर्टाने जामिनावर सोडले असून, आता तो खतरो के खिलाडीमध्ये दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

मैत्रिणीच्या बर्थडेला गेली अन् तिच्या भावाला पाहून अमृताचीच विकेट पडली! जाणून घ्या तिची लव्ह स्टोरी आणि पतीबद्दल

झोपेतून उठला आणि थेट उर्मिलाच्या प्रेमातच पडला, वाचा उर्मिला आणि आदिनाथ यांची भन्नाट प्रेमकहाणी

हे देखील वाचा