Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड शबाना आझमी यांच्या २१ वर्षीय भाचीसोबत ओला ड्रायव्हरने केलं ‘असं’ कृत्य, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

शबाना आझमी यांच्या २१ वर्षीय भाचीसोबत ओला ड्रायव्हरने केलं ‘असं’ कृत्य, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी अलीकडेच आपल्या भाचीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. हा सगळा प्रकार त्यांच्या भाचीसोबत कॅब प्रवासात घडला आहे. काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.

अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती देताना सांगितले की, “माझ्या २१ वर्षीय भाचीला ओला कॅब्सबद्दल आलेला अनुभव खूपच भयंकर होता. जो अत्यंत निंदनीय आहे.” त्याचबरोबर त्यांच्या भाचीनेही याबद्दल मत मांडताना सांगितले की, कॅब ड्राईव्हरने मध्यरात्री अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. ज्यामुळे तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला. याबद्दल मेघनाने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे.

तिने सांगितले की, “मी लोअर परळ म्हणून अंधेरी वेस्टला जाण्यासाठी कॅब बूक केली होती. मी दिलेल्या पत्त्यावर तो मला न्यायला आला. मी गाडीतही बसले होते मात्र पाच मिनिटांनी त्याच्या लक्षात आले की ट्रॅफिक खूप आहे त्यामुळे त्याला त्याच्या घरी पोहोचायला उशीर होईल. म्हणून त्याने दादरमधीच मला सोडून दिले. रात्र खूप झाली होती अशावेळी मला दुसरी टॅक्सीसुद्धा मिळणे मुश्कील झाले होते. मला पूल उतरून स्टॉपवर पोहोचायला दोन तास लागले. त्या ड्रायवरचे नाव मुस्तकिन खान आहे. हे वागणे अत्यंत चुकीचे आहे.”

मेघनाच्या या पोस्टवर ओला कंपनीने लगेच उत्तर देत म्हटले की, “आम्हाला जाणीव आहे की तुमच्यासाठी हा प्रवास किती खराब झाला असेल. आम्ही त्याबद्दल खेद व्यक्त करतो. या प्रवासाचा नंबर आमच्या इनबॉक्समध्ये तुम्ही टाका आम्ही तुमची लवकरात लवकर मदत करू.” असे उत्तर येऊनही कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नाही. या घटनेने शबाना आझमी आणि मेघना यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा