बॉलिवूडमध्ये आपण अशा अनेक जोड्या बघतो, ज्यांनी पहिले लग्न मोडत दुसरा संसार थाटला. मुख्य म्हणजे दुसरा संसार यशस्वी करून दाखवला. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आजमी. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जावेद अख्तर यांनी शबाना आजमी यांच्याशी दुसरे लग्न केले आहे. या त्यांच्या लग्नावर शबाना आजमी यांनी बऱ्याच वर्षांनी भाष्य केले आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांचे लग्न होणे एवढी साधी बाब नव्हती. यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.
जावेद अख्तर यांनी पहिले लग्न अभिनेत्री आणि स्क्रिप्ट रायटर असणाऱ्या हनी इराणी यांच्यासोबत केले होते. त्यांना या लग्नातून फरहान अख्तर आणि जोया अख्तर अशी दोन मुलं देखील झाली. यानंतर जावेद अख्तर यांच्या आयुष्यात शबाना यांची एंट्री झाली. दोघं प्रेम पडले आणि १९५४ साली त्यांनी लग्न केले. एक वर्षाने जावेद आणि हनी यांचा घटस्फोट देखील झाला.

शबाना आजमी यांनी सांगितले की, जावेद यांच्यासोबत लग्न करणे त्यांना खूपच त्रासदायक झाले होते. एकतर त्यांची दुसरे लग्न त्यातही त्यांना मुलं. त्याच्याशी लग्न होण्यासाठी मला आधी माझ्या जवळच्या नातेवाईकांशी लढावे लागले आणि मग बाहेरच्या समाजाशी. जावेद अख्तर यांच्याशी लग्न होण्याबद्दल जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा त्या म्हणाल्या, “ओह तो खूप जास्त अवघड काळ होता. मला वाटते की, तेव्हा आम्ही तिघांनी जे काही सहन केले त्याचा अंदाज कोणाला असेल. लोकांना वाटत असेल बस केले. मात्र असे नव्हते. हे लग्न करणे खूपच अवघड झाले होते. खास कर यात मुलांचा समावेश असल्यामुळे.”
शबाना यांनी पुढे सांगितले की, “जावेद अख्तर आणि मी अनेकदा आमचे नाते तोडण्याचा प्रयत्न केला होता. कारण या नात्यामध्ये मुलं असल्याने. मुलं असल्यामुळेच आम्ही दोघांनी तीन वेळा आमचे नाते संपवण्याचे ठरले होते. मात्र असे घडू शकले नाही. मात्र आज सर्व सुरळीत आहे. आज मी स्वतःला नशीबवान मानते की फरहान आणि जोया यांचे माझ्याशी खूपच जवळचे नाते आहे, तर हनी देखील आमच्याच कुटुंबाचा एक सदस्य आहे. शेवट गोड तर सर्वच गोड असेच झाले आता.”
दरम्यान जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात १९७० मध्ये झाली. शबाना या प्रसिद्ध शायर कैफी आझम यांची कन्या आहेत तर जावेद अख्तर कैफी आझम यांच्या घरी लेखन शिकण्यासाठी जायचे. जावेद अख्तर अनेकदा कैफी आझमी यांना आपल्या कविता ऐकवत असत. संध्याकाळी मैफिल जमायची ज्यात शबाना आझमीही सहभागी होत असत. अशात शबाना आणि जावेद यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि मग या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. शबाना आझमी जावेद अख्तर यांच्या शायराना अंदाजावर फिदा झाल्या होत्या.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY: विक्रांत मैसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही शोमध्ये निभावल्या आहेत मनोरंजक भूमिका
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज