Friday, April 4, 2025
Home मराठी काय सांगता राव ! फराह खान आणि तिच्या नवऱ्यात आहे 8 वर्षांचं अंतर, 16 वर्षापूर्वी शाहरूखने केलंय कन्यादान

काय सांगता राव ! फराह खान आणि तिच्या नवऱ्यात आहे 8 वर्षांचं अंतर, 16 वर्षापूर्वी शाहरूखने केलंय कन्यादान

मंडळी आपल्याकडे लग्नात कन्यादान केलं जातं. कन्यादान हे विशेषतः आई वडील करतात. मोठ मोठे स्टार्स आणि सेलिब्रिटी देखील ही परंपरा पाळताना दिसून येतात. मग त्यात धर्माचा अडथळा येत नाही. असंच एक कन्यादान आजच्याच दिवशी आपला किंग खान शाहरुख ने केलं होतं.

आपल्याला प्रश्न पडला असेल की शाहरुखची मुलं तर अजून लहान आहेत. मग हे कसं काय शक्य आहे? हो हे खरं आहे. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी ने सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान हिचं कन्यादान केलं होतं. बसला ना धक्का… चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

फराह खान ही दिग्दर्शक होण्याअगोदर बॉलिवूड मध्ये कोरिओग्राफर म्हणून आली होती. 2004 साली आलेला ‘मै हुं ना’ हा तिने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट! याच चित्रपटाच्या सेट वर तिची ओळख दिग्दर्शक शिरीष कुंदर याच्यासोबत झाली. या दोघांचंही एकमेकांसोबत अजिबात पटत नव्हतं. चित्रपटाच्या सेट वर नेहमी यांचे वाद होत असत. परंतु एके दिवशी 25 वर्षांच्या शिरीष ने 33 वर्षांच्या फराह ला प्रपोज केलं. फराहने देखील त्याला होकार दिला. दोघांनी पुढील काही काळ एकमेकांना डेट करत लग्नाचा निर्णय घेतला.

शिरीष आणि फराह या दोघांनीही तब्बल तीन वेळा लग्न केलं. पहिल्यांदा रजिस्टर पद्धतीने, दुसऱ्यांदा दक्षिण भारतीय पद्धतीने आणि तिसऱ्यांदा निकाह केला. शाहरुख आणि फराह यांचं नातं इतकं घट्ट होतं की या दुसऱ्या लग्नात फराहचं कन्यादान शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी केलं.

मध्यंतरीच्या काळात या दोघांमधील सबंध ताणले गेले होते परंतु कालांतराने ते पूर्ववत झाले. म्हणून आपण पाहतो की फराह खान हिने शाहरुख सोबत अनेक सिनेमे केले आहेत. 2004 साली आलेल्या मै हुं ना या फराह च्या दिग्दर्शक म्हणून असलेल्या पहिल्याच सिनेमात शाहरुख होता. त्यानंतर तिने त्याला घेऊन हॅप्पी न्यु इयर, ओम शांती ओम हे चित्रपट देखील केले आणि ते तुफान चालले सुद्धा! (shah rukh and and his relationship with his friends is wel  known he also reprised a special role at farah khans wedding)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पतीच्या ‘या’ गोष्टीला कंटाळलेली फराह खान लग्नाच्या एका वर्षातच जाणार होती पळून, वाचा रंजक किस्सा

सरोज खान यांच्या नकारामुळे चमकले फराह खानचे नशीब, बॉलिवूडमध्ये ‘अशी’ घडली कारकिर्द

हे देखील वाचा