Saturday, June 29, 2024

पठाण सिनेमातील ‘झूमे जो पठान’ या गाण्याचे ‘हे’ मजेशीर व्हर्जन पाहून व्हाल हसून हसून बेजार

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बरीच वर्षांनी ‘पठाण’ या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर कमबॅक करणार आहे. या चित्रपटाबद्दल संपूर्ण चित्रपटाच्या टिमसोबतच खुद्द शाहरुख देखील खूपच उत्सुक आहे. या सनीचे सध्या जोरदार प्रमोशन चालू तर आहेच सोबतच त्याच्या फॅन्सला हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार असे झाले आहे. बऱ्याच काळानंतर शाहरुखचा सिनेमा येणार असल्यामुळे त्याच्या फॅन्ससोबतच बॉक्स ऑफिस देखील खुश आहे.

मात्र शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमातील गाणे ‘बेशर्म रंग’ प्रदर्शित झाल्यानंतर लगेच वादात अडकले. या गाण्याचा वाद शमत नाही तोवर सिनेमातील ‘झूमे जो पठान’ हे दुसरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या गाण्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. मात्र यातच आता पठाणमधील ‘झूमे जो पठान’ या गाण्याचे एक मजेशीर व्हर्जन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे व्हर्जन आहे ‘लकडी की काठी’ गाण्याच्या रूपातील. या एडिटेड व्हिडिओला ट्विटरवर तैमूर जमान या अकाऊंटवरून शेअर केले आहे.

हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट झाल्या झाल्या लगेचच तुफान व्हायरल झाले आहे. या व्हिडिओवर लोकांच्या एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स येत आहेत. हे गाणे बघताना नक्कीच तुम्हाला हसायला आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. तत्पूर्वी शाहरुख खान ‘पठाण’ या सिनेमात एका गुप्तहेराची भूमिका निभावणार असून दीपिका त्याची प्रेमिका असणार आहे तर जॉन अब्राहाम नकारात्मक भूमिकेत दिसेल. हा सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त शाहरुख जवान या सिनेमात नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत दिसेल. याशिवाय तो राजकुमार हिराणीच्या ‘डंकी’मध्ये तापसी पन्नूसोबत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज अभिनेते सतीश शाह यांच्यावर झाली वर्णभेदावरून कमेंट, दिले सणसणीत उत्तर
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार

 

हे देखील वाचा