Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरुख खानला स्थान, ऑस्कर विजेत्या राजामौलीचा देखील समावेश

जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरुख खानला स्थान, ऑस्कर विजेत्या राजामौलीचा देखील समावेश

किंग खान शाहरुख खानचे संपूर्ण जगात कोट्यवधी फॅन्स आहेत. त्याचा चार्म त्याच्या फॅन्सवर मोठा प्रभाव टाकत असतो. बराच मोठा काळ गेल्यानंतर शाहरुख ‘पठाण’मधून परतला आणि धमाकाच केला. या सिनेमानंतर तर त्याचा फॅन फॉलोविंगमध्ये मोठी वाढ झाली. शाहरुख सोबतच दाक्षिणात्य दिग्दर्शक एस एस राजामौली हे देखील त्याच्या आरआरआर या सिनेमामुळे संपूर्ण जगात त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. आता या दोघंही दिगज्जांच्या शिरपेचात आता अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकतेच टाईम मासिकाने २०२३ सालातील १०० प्रभावी लोकांची यादी जाहीर केली आहे.

या मोठ्या यादीमध्ये भारतीय असलेल्या शाहरुख खान आणि दिग्दर्शक एस एस राजामौलीने देखील त्यांची जागा बनवली आहे. या दोघांसोबतच लेखक सलमान रुश्दी आणि टेलीविजन होस्ट, जज पद्मा लक्ष्मी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

शाहरुख खानने 2023 TIME100 रीडर पोल जिंकला होता. यात वाचकांनी त्याला वैयक्तिकरित्या मतं दिली होती. या मताच्या आधारेच त्याला टाईम मासिकात सर्वात प्रभावशाली व्यक्ती असलेल्या या वार्षिक यादीत स्थान देण्यात आले आहे. लोकं त्याला या यादीसाठी सर्वात काबील व्यक्ती म्हणून मानतात.

तर दुसरीकडे आरआरआर सिनेमातील ‘नाटू-नाटू’ या गाण्यासाठी ऑस्कर जिंकणारे साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली यांना देखील टाईमने १०० प्रभावशाली लोकांच्या यादीत स्थान दिले आहे. या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपति जो बाइडन, ब्रिटेनचे किंग चा‌र्ल्स, सीरियाई स्वीमर आणि सामाजिक कार्यकर्ता सारा मर्दीनी आणि युसरा मर्दीनी यांचा देखील समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

हे देखील वाचा