Friday, July 5, 2024

‘मुलगी पटवण्यासाठी टिप्स द्या’, चाहत्याच्या या प्रश्नावर ‘किंग’ खानने दिले लक्षवेधी प्रत्युत्तर, तुम्हीही कराल प्रशंसा

शाहरुख खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्याआधी बुधवारी (३१ मार्च) त्याने चाहत्यांना एक सरप्राईज दिले. शाहरुखने एक #आस्कएसआरके (#AskSRK) सेशन आयोजित केले होते. जिथे तो त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसला. दरम्यान, एका युजरने त्याला असा प्रश्न विचारला की, तो पाहून किंग खानने त्याचा चांगलाच क्लास घेतला.

त्या युजरने लिहिले, “मुलीला पटवण्यासाठी एक दोन टिप्स द्या, #AskSRK.” याला प्रत्युत्तर देत शाहरुख म्हणाला, “सर्व प्रथम, मुलींसाठी ‘पटवणे’ हा शब्द वापरू नका, अधिक सभ्यता आणि आदर दर्शवा.”

शाहरुख खानला त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा कधी करणार यावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेले. त्यानेही अशा प्रत्येक प्रश्नाला मजेदार पद्धतीने प्रतिसाद दिला. एकाने लिहिले, “सर तुम्ही अनाऊन्समेंट कधी कराल?” तर शाहरुख म्हणाला, “अनाऊन्समेंट रेल्वे स्टेशन आणि विमानतळासाठी असते, माझ्या मित्रा. चित्रपटाची हवा तर आपोआप बनली जाते. तर दुसऱ्याने विचारले, “तुम्ही मोठ्या स्क्रीनवर कधी दिसणार सर?” यावर अभिनेत्याने लिहिले- ‘भाऊ बनवत आहे, बनवत आहे.”

शाहरुख खानच्या बालपणीचा एक फोटो शेअर करत, एका चाहत्याने विचारले की, “हा फोटो कोणत्या वर्षाचा आहे?” यावर अभिनेत्याने गंमत करत लिहिले की, “माझ्या मते हा डायनासोरच्या युगातील असेल.”

शाहरुख खान अखेरच्या वेळी, 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहेत. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोबाईलच्या दुकानाला सोनू सूदचं नाव, ‘१०० रुपयांचा रिचार्ज मिळेल का?’ म्हणत अभिनेत्याचा मजेशीर अंदाजात प्रतिसाद

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा