Saturday, April 12, 2025
Home बॉलीवूड म्हणूनच आहे तो बादशाह! मरणाच्या दारात असलेल्या 60 वर्षीय चाहतीची शाहरुख खानने केली शेवटची इच्छा पूर्ण

म्हणूनच आहे तो बादशाह! मरणाच्या दारात असलेल्या 60 वर्षीय चाहतीची शाहरुख खानने केली शेवटची इच्छा पूर्ण

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या चाहत्यांची भारतातच नव्हे तर, परदेशातही कमी नाही. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. दरम्यान, शाहरुख खानच्या अशाच एका चाहत्याशी संबंधित बातम्या समोर आली आहे. जी गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत आहे. शिवानी चक्रवर्ती या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या किंग खानच्या फॅनचे नाव आहे. त्या 60 वर्षीच्या आहेत. त्या कर्करोगाच्या शेवटच्या स्टेजवर आहे.

शिवानी यांनी कर्करोगाशी लढा देत असताना आपली एक इच्छा व्यक्त केली आहे. आयुष्याच्या या कठीण टप्प्यातही शाहरुख खानबद्दलची त्यांची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. शिवानीने आतापर्यंत शाहरुख खानचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. इतकच नाहीतर शिवानी शाहरुखचा नुकताच प्रदर्शित झालेला पठाण चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेल्या होत्या.

60 वर्षीय शिवानी एका आयपीएल सामन्यादरम्यान शाहरुखच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर शाहरुखने कोलकाता नाईट रायडर्स खरेदी केली. आता शिवानीला कळून चुकले आहे की, ती फार काळ जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही . त्यामुळे तिने मृत्यूपूर्वी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शिवानीच्या म्हणण्यानुसार, तिला मरण्यापूर्वी एकदा शाहरुख खानला प्रत्यक्षात बघायचे आहे. याशिवाय, जर हे शक्य असेल तर तिला स्वत: शाहरुखसाठी बंगाली जेवण बनवायचे आहे आणि त्याला खायला द्यायचे आहे. शाहरुखने आपल्या मुलीला आशीर्वाद द्यावा अशी शिवानीची इच्छा आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुखने शिवानीची इच्छा ऐकून तिला काॅल करण्याचा निर्णय घेतला. त्याने वेळात वेळ काढून शिवानीला व्हिडिओ काॅल केला. तो तिच्याबर 40 मिनीटे गप्पा मारत होता. इतकच नाही तर त्याने तिला आर्थिक मदत करण्याचे आणि लवकरच भेटण्याचे आश्वासन दिले आहे. शिवानी यांची मुलगी प्रिया म्हणते की, तिच्या आईला दुःखाच्या दिवसात शाहरुखला बघायची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. प्रियाने अतिशय भावूक होऊन या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.

हे देखील वाचा