Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड आर्यन खानच्या चिंतेत शाहरुख आणि गौरी झाले हतबल, त्याला सोडवण्यासाठी करताय शर्थीचे प्रयत्न

आर्यन खानच्या चिंतेत शाहरुख आणि गौरी झाले हतबल, त्याला सोडवण्यासाठी करताय शर्थीचे प्रयत्न

 

अं’मली पदार्थ सेवन प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळे सिनेजगतात नाराजीचा सूर उमटत आहे. कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने आर्यनच्या अडचणीत वाढ झाली. आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान मात्र प्रचंड तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे. जेलमधे असलेल्या मुलाच्या काळजीने खान कुटुंब हतबल झाले आहे.

आर्यन खानच्या सुटकेसाठी शाहरुखने शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नाही. आर्यन खानच्या चिंतेत खान दाम्पत्याची झोप उडाली आहे. नुकतीच गौरी खान तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आर्यनसोबत दिसून आली. आर्यनला जामीन मिळेल अशी तिला आशा होती परंतु आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला गेल्याने गौरी खान भावूक झालेली पाहायला मिळाली. इतकेच नव्हे तर कोर्टाच्या निर्णयानंतर आर्यनसुद्धा शाहरुखच्या गळ्यात पडून रडताना दिसला. या सगळया प्रकारामुळे शाहरुख खान मात्र पुरता निराश झाला आहे.

आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान दोघांची भूकच हरपली आहे. याबाबत कोर्टाने आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे, आर्यनला बाकी कैद्यांप्रमाणेच जेल मधील जेवण दिले जाणार आहे. परवानगीशिवाय घरचे जेवण दिले जाणार नाही. इतकेच नव्हे तर इतर कैद्यांप्रमाणे सकाळी सहा वाजता उठावे लागेल अशी कठोर नियमावली सांगितली आहे. मुलाच्या या परिस्थितीमुळे शाहरुख गौरी मात्र प्रचंड दुःखी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इतक्या हाताबाहेर जाईल याची शाहरुख आणि गौरी यांनी कधीच कल्पना केली नव्हती, आर्यनच्या अटकेची माहिती मिळताच शाहरुख खानने हालचाली सुरू केल्या होत्या. यासाठी त्यानं देशातील सर्वोत्तम वकील सतीश मानेशिंदे यांच्याकडे ही केस सोपवली होती. सतीश मानेशिंदे यांनीही आर्यन खानला लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही दिली होती. परंतु कोर्टाने मात्र आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळुन लावल्याने शाहरुख खानला मोठा धक्का बसला.

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख आणि गौरीला मुलाच्या आरोग्याची चिंता सतावत असून, ते दिवसातून अनेक वेळा NCB कार्यालयात फोन करुन त्याच्या प्रकृतीची विचारणा करत आहेत. सोबतच आर्यनला घरचे कपडे आणि जेवण देण्याची विनंतीही त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात NCB ने वीस जणांना ताब्यात घेतले असून, NCB ने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने अं’मली पदार्थ सेवन केल्याचे कबूल केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

हे देखील वाचा