Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड ‘या लोकांना एवढा का भाव देता’ फॅनसोबतच्या ‘त्या’ वागण्यावरून शाहरुख खान झाला ट्रोल

‘या लोकांना एवढा का भाव देता’ फॅनसोबतच्या ‘त्या’ वागण्यावरून शाहरुख खान झाला ट्रोल

शाहरुख खान अर्थात बॉलिवूडचा किंग खान. शाहरुख खानला संपूर्ण जगात असंख्य फॅन्स आहेत. इंडस्ट्रीमधील अतिशय चांगला आणि इतरांना चांगली वागणूक देण्यासाठी प्रसिद्ध म्हणून शाहरुख खानचे नाव घेतले जाते. त्याचे चाहते नेहमीच त्याला फॉलो करतात. त्याच्याशी बोलण्याची, फोटो काढण्याची, भेटण्याची, बघण्याची एकही संधी ते सोडत नाही. तो सतत मीडियामध्ये सोशल मीडियावर विविध कारणांमुळे गाजत असतो. आता यातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. यात त्याचे krutya पाहून त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शाहरुख मुंबई एयरपोर्टवर दिसत असून, त्याला पाहून एक व्यक्ती त्याचा फॅन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र शाहरुख त्याचा हात जोरात खाली झटकतो आणि रागात चालू लागतो. त्याच्या या कृतीमुळे त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला मोठ्या प्रमाणावर खरीखोटी सुनावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले, “खूपच असभ्य’, दुसऱ्याने लिहिले, “माहित नाही का पण लोकं या लोकांना एवढे डोक्यावर का बसवतात. सेल्फी घायची तर एखाद्या डिझर्विंग व्यक्तीसोबत घ्या”. अजून एकाने लिहिले, “माहित नाही का लोकांना स्वतः अपमान करून घयायला का आवडते. पठाण चालल्यामुळे त्यात गर्व आला आहे.

दरम्यान शाहरुख खानच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच नयनतारासोबत ‘जवान ‘ या सिनेमात दिसणार असून, हा सिनेमा याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो डंकी मध्ये तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करतात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा