Thursday, July 18, 2024

जाळ अन् धूर संगटच! पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘जवान’चे वादळ; आकडा एकदा वाचाच

सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे शाहरूख खानच्या ‘जवान‘चे वारे वाहताना दिसत आहे. शाहरूख खाने ‘जवान‘ चित्रपटात दमदार कामगिरी करून पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांना त्याच्या प्रेमात पाडले आहे. शाहरूखच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘जवान‘ बाॅक्स ऑफिसवर चांगलेच वर्चस्व गाजवत आहे. शाहरुख खानचा नुकताच रिलीज झालेला ‘जवान‘ भारतीय बॉक्स ऑफिसवर दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटाची कमाई आणि ऍडव्हान्स बुकिंगचे आकडे प्रचंड वाढत आहेत.

जबरदस्त ‘जवान‘ची (Shahrukh Khan) आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे पहिल्या सोमवारी ‘जवानने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, पण आता ‘जवान’ चित्रपटाने मोठा धुमाकूळ घातला आहे. बॉलीवूड आणि हिंदी चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट ‘जवान आहे.

माध्यामातील वृत्तानुसा, जर आपण पाचव्या दिवशी ऍडव्हान्स बुकिंगबद्दल बोललो तर, ‘जवान’ची भारतात एकूण 7.10 कोटी तिकिटे विकली गेली आहेत. हा एक प्रभावी आकडा आहे. 2023च्या अनेक मोठ्या बॉलीवूड रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी पहिल्या दिवसाच्या तिकीट विक्रीपेक्षा खूप जास्त आहे. किंबहुना तो ‘पठाण’च्या तुलनेत देखील जास्त आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये 5.20 कोटी रुपयांची तिकिटे विकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Atlee (@atlee47)

 ‘जवान’ने भारतात 4 दिवसांत 286.16 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर आता या चित्रपटाने केवळ चार दिवसांत जगभरात 520.79 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह जवान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक वीकेंड कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. त्यामुळे ‘जवान’ आरामात 30 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. विशेष म्हणजे ‘जवान’च्या तिकिटाचे दर आज कमी झाले आहेत. त्यामुळे ज्यांनी वीकेंडमध्ये हा अ‍ॅक्शन थ्रिलर पाहणे चुकवले ते आज या संधीचा लाभ घेऊ शकतात.

अधिक वाचा-
शाहरुख खानच्या ‘जवान’ची अखिलेश यादवांना पडली भुरळ; म्हणाले, ‘जो ज़िंदा हो तो फिर…’
मुहूर्त ठरला! अल्लू अर्जुनचा अंगावर काटा आणणारा ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

हे देखील वाचा