Friday, August 8, 2025
Home साऊथ सिनेमा झी स्टुडिओच्या ‘या’ चित्रपटात होणार नयनताराची एन्ट्री, लवकरच सुरू होणार शूटिंग

झी स्टुडिओच्या ‘या’ चित्रपटात होणार नयनताराची एन्ट्री, लवकरच सुरू होणार शूटिंग

साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नयनताराचे (nayanthara) नाव सध्या चमकत आहेत. एकापाठोपाठ एक उत्तम चित्रपट तिला मिळत आहेत. एकीकडे ती शाहरुख खानच्या (shahrukh khan)  ‘जवान’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याचवेळी आता आणखी एक उत्तम चित्रपट तिच्या झोळीत पडला आहे. नयनतारा लवकरच दिग्दर्शक नीलेश कृष्णाच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. निर्मात्यांनी आज या चित्रपटाची जोरदार घोषणा केली आहे.

अभिनेत्री नयनताराच्या करिअरमधील हा ७५ वा चित्रपट आहे. नयनताराच्या या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज करत आहे. नीलेश कृष्णा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. नवविवाहित नयनताराच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही.

हाती आलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा एका जबरदस्त टीझर व्हिडिओसह केली आहे. झी स्टुडिओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. त्याचे कॅप्शन असे लिहिले आहे की, “झी स्टुडिओज नयनतारासोबत तिचा ७५ वा चित्रपट बनवणार आहे आणि याबद्दल खूप उत्सुक आहे. लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. नयनताराने नुकतेच लग्नगाठ बांधली आहे. तिने चेन्नईमध्ये साऊथ सिनेमाचे दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी लग्न केले. तसे, नयनतारीच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेवरून हे स्पष्ट झाले आहे की ती लग्नानंतर चित्रपटांमधून ब्रेक घेण्याच्या मूडमध्ये नाही. नयनतारा तिच्या कामाबद्दल खूप गंभीर आहे. लग्न होताच ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झाली. ‘जवान’ आणि तिच्या ७५ व्या चित्रपटाव्यतिरिक्त, नयनतारा चिरंजीवी स्टारर ‘गॉडफादर’ आणि अजित कुमारच्या ६२ व्या चित्रपटात देखील दिसणार आहे. इतकंच नाही तर या चित्रपटांशिवाय नयनतारा ‘कनेक्ट’ आणि ‘गोल्ड’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आलियानंतर राखी सावंतने दिली लग्नाआधीच दिली गुड न्यूज, देणार जुळ्या मुलांना जन्म?

बाई बाई बाई ! हिच्या फॅशनला एक तोडचं नाही, पाहा उर्फी जावेदचा ब्लेडचा नवा पराक्रम

प्रकाश मेहरा यांनीच अमिताभ बच्चन यांना बनवले ‘अँग्री यंग मॅन’, बदलली चित्रपटांची कहाणी

 

 

हे देखील वाचा