Monday, July 1, 2024

अबब! प्रदर्शित होण्याआधीच शाहरुखच्या चित्रपटाने केली बजेटपेक्षा जास्त कमाई

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांना आगामी चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे. शाहरुख ‘पठाण’सोबत तब्बल 5 वर्षांनंतर मुख्य भूमिकेत दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने  वाट पाहत आहेत, मात्र त्याआधी  त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. 

या वर्षी जूनमध्ये, जेव्हा शाहरुखने एक मजेदार व्हिडिओ शेअर करताना ‘जवान’ ची घोषणा केली तेव्हा त्यातील व्हिज्युअल, संगीत आणि त्याचा लूक पाहून चाहते वेडे झाले होते. अलीकडची गोष्ट म्हणजे यूट्यूबवर या घोषणा व्हिडिओला 29 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांच्या या क्रेझचा ‘जवान’वर चांगलाच परिणाम झाला असून रिलीजपूर्वीच या चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केल्याचे बोलले जात आहे.दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठे हिट चित्रपट देणा-या दिग्दर्शक एटलीसोबत शाहरुखच्या कामाची लोकांमध्ये अशी क्रेझ आहे की, ‘जवान’ चित्रपट प्रदर्शनाचे हक्क घेण्यासाठी जोरदार स्पर्धा लागली होती.

काही दिवसांपूर्वी रिपोर्ट्समध्ये असे समोर आले होते की नेटफ्लिक्स चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेण्यात यशस्वी ठरले आहे. नेटफ्लिक्सने ‘जवान’च्या ओटीटी राईटसाठी 120 कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात आले. त्याचबरोबर की ‘जवान’चे सॅटेलाइट हक्कही विकले गेले आहेत. नेटफ्लिक्स OTT वर ‘जवान’ स्ट्रीम करेल, तर झी टीव्हीला या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क मिळाले आहेत. ‘जवान’ने दोन्ही हक्क विकून 250 कोटी रुपये कमावल्याचे सांगितले जात आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी त्यात काही तथ्य असेल तर ही कमाई ‘जवान’च्या बजेटपेक्षा जास्त आहे.

रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते की, ‘जवान’चे बजेट 180 कोटी रुपयांच्या जवळपास आहे आणि अशा परिस्थितीत 250 कोटींची कमाई करून हा चित्रपट आधीच फायदेशीर ठरला आहे. शाहरुख हा हिंदी चित्रपटांचा अव्वल स्टार आहे, तर साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा त्याच्यासोबत ‘जवान’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. सातत्याने दमदार परफॉर्मन्स देणारा विजय सेतुपती या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत आहे, तर थलपथी विजय आणि दीपिका पदुकोण यांच्या कॅमिओ भूमिका  आहेत. ‘जवान’ केवळ हिंदीतच नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच हिंदी चित्रपट प्रेक्षकांमध्येच नाही तर देशभरातील चित्रपट रसिकांमध्ये ‘जवान’बद्दल उत्सुकता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- भारताची पहिली ‘स्टंटगर्ल!’ ‘बसंती’ बनून धोकादायक सीन शूट करताना मरता-मरता वाचलेली रेशमा पठाण
‘एकता कपूरच्या मालिकांनी टेलिव्हिजनची वाट लावली…’, दिग्गज अभिनेत्याची जोरदार टिका
चाळिशी पार करूनही एकटी जगतेय आयुष्य, साखरपुडा झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याने दिलेला धोका

हे देखील वाचा