पुन्हा एकदा शाहरुख खानने तोच बॉक्स ऑफिसचा बादशहा असल्याचे ‘पठाण’च्या रूपाने सिद्ध केले आहे. पठाणला मिळालेले अफाट यश पाहून पुन्हा एकदा बॉलीवूडला नवसंजीवनी मिळाली आहे. आज शाहरुख खानला किंग खान म्हटले जाते ते त्याच्या एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटांमुळेच. शाहरुखने त्याच्या करियरमध्ये दिवानापासून ते डीडीएलजे, वीर झारापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे त्याने दिले आहेत. मात्र या सर्वांमध्ये त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांना नकार दिला आहे. या यादीत आमिर खानचा एक ब्लॉकबस्टर सिनेमाचा देखील समावेश आहे.
राजकुमार हिराणी यांच्या ‘3 इडियट्स’ या सिनेमाने आमिर खानच्या करियरला एक वेगळीच ओळख आणि उंची मिळवून दिली. मात्र आमिर खानच्या आधी हा सिनेमा शाहरुख खानला ऑफर करण्यात आला होता. मात्र त्याने या सिनेमाला नकार दिला आणि मग हा सिनेमा आमिर खानकडे आला. जेव्हा राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानला ‘रँचो’ या भूमिकेसाठी विचारणा केली तेव्हा त्याला वाटले की तो ही भूमिका चांगल्या पद्धतीने वठवू शकणार नाही. यामुळे त्याने हिरानी यांना नकार दिला. पुढे ते आमिर खान कडे गेले आणि आमिर ने तर त्याच्या अभिनयाने सिनेमाला चार चांद लावले.
‘3 इडियट्स’ सिनेमाने संपूर्ण जगात ४०० कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला होता. तर आता शाहरुख खानच्या पठाणने संपूर्ण जगात १००० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. ‘3 इडियट्स’ हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. शाहरुख खानने ‘3 इडियट्स’ सोबत एक था टायगर, जोधा अकबर, मुन्नाभाई एमबीबीएस, लगान, रंग दे बसंती, कहो ना प्यार है आदी अनेक चित्रपटांना नकार दिला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री
कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…