Thursday, July 18, 2024

असा असतो किंग खानचा विकेंड, सगळं काही चांगलं करूनही खावा लागतो पत्नीचा ओरडा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तो वैयक्तिक आयुष्याबाबत देखील तो खूप चर्चेत असतो. त्याच्या बाबत अनेक गोष्टी चाहत्यांना माहित आहेत. अशातच शाहरुख खानची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फरीदा जलाल त्याला प्रश्न विचारताना दिसत आहेत. फरीदाने विचारले- तो आपल्या कुटुंबासोबत सुट्टी कशी घालवतो? यावर शाहरुख खानने अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या.

शाहरुख खानने (shahrukh khan) सांगितले होते की, तो त्याची सुट्टी कशी घालवतो. शाहरुख खान म्हणाला, “मी रविवारी सकाळी उशिरा उठतो कारण मी रात्री उशिरा झोपतो. सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट म्हणजे, गेल्या 6 दिवसात मी किती काम केले, घरात किती कमी होते. याकडे मी अजिबात लक्ष देत नाही यामुळे मी माझ्या बायकोचा ओरडा खातो.”

तो पुढे म्हणाला, ” जेव्हा मी गौरीला मी म्हणतो, मी खूप थकलो आहे, ती म्हणते की, “काही नाही, मला काही ऐकायचे नाही. आणि जेव्हा ती तिचे बोलणेथांबवते तेव्हा मी तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो तुझे डोळे किती सुंदर आहेत. मी तिला हे सांगताच ती पण म्हणते कि आज तू पण थकलेला दिसत आहेस आणि मग किंग आहे.”

शाहरुख पुढे म्हणाला की, “मी रविवारी आंघोळ करत नाही. मी त्या दिवशी लोळत असतो. मग चिप्स येतात, थम्प्स अप आणि टीव्ही चालू होतो. थोडा चित्रपट पाहतो. मग मी माझ्या कुत्र्याला आंघोळ घालतो. मग दुपारी मित्र येतात, आम्ही खेळ खेळतो आणि मग ते संध्याकाळपर्यंत चालते. मग संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जातो. सहसा डिस्कोथेक किंवा नृत्याच्या ठिकाणी. माझ्या पत्नीला डान्स करायला आवडते. ती मला तिच्या अटींवर डान्स करायला लावते ही गोष्ट वेगळी. त्यानंतर आम्ही एकत्र जेवून झोपतो.” अशाप्रकारे त्याने त्याचा अनुभव शेअर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
कसं पकडलं गौरीनं शाहरुख अन् प्रियांकाचं लफडं? एका क्लिकवर घ्या जाणून
म्हणून शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या नात्यात निर्माण झाला होता दुरावा, मिसेस खानने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा