Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड आज 6000 कोटींचा मालक असणाऱ्या शाहरुख खानच्या कुटुंबाला एकेकाळी दोन वेळची भाकरी मिळणे होते कठीण!

आज 6000 कोटींचा मालक असणाऱ्या शाहरुख खानच्या कुटुंबाला एकेकाळी दोन वेळची भाकरी मिळणे होते कठीण!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे नाव आज भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याच्या यादीत समाविष्ट झाले आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी शाहरुखने खूप मेहनत घेतली आहे. शाहरुखला लहानपणी खूप गरिबीचा सामना करावा लागला आहे. आज आम्ही शाहरुख खानच्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगत आहोत ती भारताच्या फाळणीपूर्वीची आहे. शाहरुख खानचे वडील तेव्हा पाकिस्तानातील पेशावरमध्ये राहत होते.

ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होते. देशात इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू होते. शाहरुख खानचे वडील या युद्धाचे स्वातंत्र्यसैनिक होते. काही काळानंतर भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पण देशाचे दोन तुकडे झाले, एक पाकिस्तान आणि दुसरा हिंदुस्थान. त्याच वेळी शाहरुख खानच्या वडिलांनी आपला देश म्हणून भारताची निवड केली आणि दिल्लीत राहू लागले. त्या काळात शाहरुखच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती आणि तो गरिबीचा सामना करत होता.

त्यांच्या कुटुंबाला दोन वेळची भाकरी मिळणेही कठीण झाले होते. पण या कुटुंबातील एक मुलगा एवढा मोठा स्टार बनेल, ज्याच्या प्रकाशाने सारे जग उजळून निघेल, हे कोणाला माहीत होते. लहानपणी शाहरुखला खेळाडू व्हायचे होते. एकदा खेळताना तो शाळेत पडला आणि त्याला खूप दुखापत झाली, त्यामुळे खेळाडू होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. पण नशिबाने त्याला हिरो बनवले. शाहरुख खान आता 6000 कोटींचा मालक आहे.

शाहरुखने नंतर बॉलिवूडमध्ये काम करण्याचे ठरवले. मुंबईला आल्यावर देखील त्याने खूप संघर्ष केला. त्याला दोन वेळचे जेवण देखील वेळेवर मिळत नसे. फुटपाथवर झोपून तो दिवस ढकलू लागला. परंतु हळूहळू त्याने काम करून त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज तो बॉलिवूडचा एक सुपरस्टार आहे. त्याने नंतर गौरीशी विवाह केला. त्याला तीन मुले आहेत.

हेही वाचा-
हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप; बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरू
शाहरुख खानच्या आधी ‘या’सुपरस्टारला ‘डर’ चित्रपटात ‘राहुल मेहरा’ची भूमिका केली होती ऑफर

हे देखील वाचा