Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड बाॅलिवूडला कोरोनाचा विळखा! शाहरुखसह ‘या’ कलाकारांना कोरोना, बघा संपूर्ण यादी

बाॅलिवूडला कोरोनाचा विळखा! शाहरुखसह ‘या’ कलाकारांना कोरोना, बघा संपूर्ण यादी

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. किंग खानला कोव्हिड- १९ ची लागण झाली आहे. गेल्या एका आठवड्यात अक्षय कुमार (Akshay Kumar), कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) कोव्हिड- १९ पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. आता शाहरुखला लागण झाल्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपले पाय पसरवले असून, हळूहळू सर्वांनाच आपल्या कवेत घेताना दिसत आहे.

रविवारी (५ जून) कॅटरिना कैफला कोव्हिड- १९ ची लागण झाल्याची माहिती समोर आली. काही तासांनंतर शाहरुख खानलाही कोव्हिड- १९ ची लागण झाल्याची बातमी आली. अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची घोषणा करत, त्याचा टीझर रिलीझ केला आणि त्याच दिवशी चित्रपटाचे पोस्टर देखील रिलीझ केले. तेव्हापासून तो सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. (shah rukh khan tests positive for covid 19 see list)

कॅटरिनाबद्दल बोलायचे झाले तर, तिने यावर्षी होणाऱ्या आयफा अवॉर्ड्समध्येही भाग घेतला नाही. आयफा २०२२मध्ये, तिचा पती विकी कौशल (Vicky Kaushal) एकट्याने ग्रीन कार्पेटवर उपस्थिती दर्शवली. आता कार्यक्रमाला न येण्याचे कारण अभिनेत्री आजारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कॅटरिना तिचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून, लवकरच तिच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसणार आहे.

करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाला कोरोना स्फोट?
नुकत्याच ५ मे रोजी झालेल्या करण जोहरच्या (Karan Johar) ५०व्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, करणच्या पार्टीत गेलेले जवळपास ५०-५५ सेलिब्रिटी कोव्हिड- १९ पॉझिटिव्ह झाले आहेत. जे आता खरे ठरताना दिसत आहे. कारण आतापर्यंत अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि शाहरुख खान ज्यांना संसर्ग झाला आहे, ते सर्वजण या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा