Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड ‘हात जोडतो, माझ्या मुलापासून दूर राहा’, अजय देवगणसोबत पान मसाल्याची जाहिरात केल्यानंतर शाहरुख खान ट्रोल, भन्नाट मीम्स व्हायरल

‘हात जोडतो, माझ्या मुलापासून दूर राहा’, अजय देवगणसोबत पान मसाल्याची जाहिरात केल्यानंतर शाहरुख खान ट्रोल, भन्नाट मीम्स व्हायरल

बॉलिवूडच्या बादशाह खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फार पूर्वीपासूनच उत्सुक आहेत. दोन वर्षांपासून शाहरुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यामुळे चाहते त्याला खूप मिस करत आहेत आणि लवकरच चित्रपटात परत येण्याचे आवाहनही करत आहेत.

शाहरुखने काही चित्रपट साइन केले असले, तरी त्याचे शूटिंग अद्याप पूर्ण झाले नाही. यादरम्यान, शाहरुख एका जाहिरातीमध्ये दिसला, ज्यामध्ये अजय देवगणही त्याच्यासोबत होता. मात्र, बऱ्याच दिवसानंतर त्याला रुपेरी पडद्यावर पाहून, चाहते त्याला परत येण्याच्या शुभेच्छा देण्याऐवजी पश्चाताप व्यक्त करत आहेत. जाहिरातीमध्ये शाहरुखला पाहून चाहत्यांना चांगलाच राग आला आहे. याचे कारणही असेच आहे.

वास्तविक, पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये अजय देवगणसोबत आता शाहरुख खानही सामील झाला आहे. जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आणि ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. अजय देवगण बऱ्याच वर्षांपासून पान मसाल्याची जाहिरात करत आहे आणि याच कारणामुळे त्याला वाईट पद्धतीने ट्रोल देखील केले जाते.

आता शाहरुखही यात सामील झाला आहे, जे त्याच्या चाहत्यांना अजिबात आवडले नाही. सोशल मीडियावर बरेच युजर्स शाहरुखची खिल्ली उडवत आहेत. असे असूनही त्याचे चाहते काहीही न बोलता, आपली निराशा व्यक्त करीत आहेत. याव्यतिरिक्त काही युजर्स, शाहरूख आणि अजयला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहून आनंदित आहेत.

पान मसालाच्या जाहिरातीमध्ये शाहरूख खानला पाहिल्यानंतर ट्विटरवर बरेच मीम्स व्हायरल होत आहेत. ट्रोलर्स अजय आणि शाहरुखच्या चाहत्यांची चांगलीच मजा घेत आहेत.

https://twitter.com/JatinTrivedi26/status/1373203387630559238

शाहरुखच्या एका चाहत्याने एक मजेदार मीम पोस्ट केले आहे. ज्यामध्ये शाहरुख फॅन्स अजयला म्हणतात, “हात जोडून विनवणी करतो, माझ्या मुलापासून दूर राहा.”

https://twitter.com/REMINISCENTVEER/status/1373146912790962176

https://twitter.com/SRKsNishu/status/1373154452446748673

दुसर्‍या युजरने एक मीम शेअर केले आहे, ज्यात म्हटले आहे की, ‘मुझे तो तेरी लत लग गई.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- 

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

-नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

हे देखील वाचा