Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय आहे ‘गैटेका’ नावाच्या चित्रपटामागचं प्रकरण? शाहरुखच्या ट्वीटने सोशल मीडियावर खळबळ

तब्बल 4 वर्षानंर पठाण चित्रपटाद्वारे ग्रॅंड एंट्री करत शाहरुख खानने भारतामध्या धुमाकूळ घातला आहे. जिकडे तिकेड पठाणमय वातावरण पाहायाला मिळत. चाहत्यांप्रती शाहरुख साठी प्रेम आणि त्याच्या धाडसाला पाहून अनेकांना समजून आले की,  किंग खान हा बॉलिवूडचाच नाही तर चाहत्यांच्या मनावर राज्या करणरा किंग खान आहे. पठाण चित्रपटाने दोन दिवसातच 100 कोटींपेक्षा अधीक कमाई करुन बॉक्सऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवला आहे. अशातच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर केलं आहे ज्यामुळे शाहरुखने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

पठाण (Pathan) स्टारर शाहरुख खान (Shahrukh Khan) याने नुकतंच सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर केलं आहे ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधलं आहे. अभिनेत्याने ट्वीटमद्ये 19197 साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गैटेका’ हॉलिवूड चित्रपटाचा डायलॉग शेअर केला आहे ज्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटासाठी चांगलीच उत्सुकता वाढली आहे. मात्र, हे प्रकरण नेमकं आहे काय? कोणता हा चित्रपट? असा अनेकांना प्रश्न पडला आहे, अनेक चाहते इंटरनेटवर गैटेका चित्रपट सर्च करत आहेत. (Shahrukh Khan Share Tweet gattaca movi dialogue)

शाहरुखने ट्वीट शेअर करत लिहिले की, ”गैटेका ..मी परत येण्यासाठी हातात काहीच शिल्लक नाही ठेवलं आहे. मला वाटतं आयुष्य काहीसं असंच असतं. तुम्हाला तुमचं परतणं कधी प्लॅन करावं लागत नाही. तुम्हाला फक्त पुढे जायचं असतं. कधी मागे परतू नका..किंबहुना त्या गोष्टीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जे तुम्ही सुरू केलेलं असतं. हा एका 57 वर्षाच्या माणसाचा सल्ला आहे.”

शाहरुखचा सल्ला नेमंक सल्ला आहे की, चित्रपटाचा डायलॉग? नेमकं ‘गैटेका’ सिनेमा आहे तरी कोणता असा सवाल अनेक चाहत्यांना पडला आहे त्यामुळे अनेक चाहते या चित्रपटाबद्ददल जाणुन घेण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. थोडक्यात चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर ‘गैटेका’ हा एक हॉलिवूड डिस्टोपियन सायन्स फिक्शन चित्रपट आहे, जो 1997 साली प्रदर्शित झाला होता.

गैटेका या चित्रपटाची कथा भविष्यावर आधारित असून यामध्ये माणूस जेनेटिक्सच्या सहाय्यानं आपल्या क्षमतेला ओळखू शकतो. त्यामुळे अनेक लोकांना जेनेटिक भेदभावाचा सामना कारावा लागतो. यामध्ये एक मुलगा आपलं नशीब पालटण्यासठी सिस्टीमशी खोटं बोलतो आणि त्याच्या स्वप्ननांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो रस्ता नक्कीच सोप नसतो.

हा चित्रपट बनवण्यासठी तब्बल 36 मिलियन डॉलर म्हणजेच 294 कोटी खर्च केला होता मात्र, बॉक्सऑफिवर या चित्रपटाने 12.5 मिलियन डॉलर म्हणजेच फक्त 101 कोटी रुपयांचीच कामई केली होती. कारण यामध्ये दाखवली गेलेली हिंसा, त्याची भाषा आणि सेक्शुअलिटी. म्हणुन या चित्रपटाला 13 रेटिंग मिळालं होतं. जर हा चित्रपट तुम्हालाही पाहायचा असेल तर थोडं कठीण आहे, कारण हा चित्रपट भारतामध्ये ओटीटीवर उपलब्ध नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO| ‘पठाण चित्रपट पाहायला आलेल्या चाहत्यांच्या गर्दीमुळे वाद, लाठ्या काठयांनी झाली हाणामारी
हंसती हंसती रहे तु हस्ती रहे, हया की लाली खिलती रहे…!

हे देखील वाचा