Tuesday, August 5, 2025
Home अन्य ‘भाईजान’ सलमान खानबाबत विचारलेल्या प्रश्नावर शाहरुखने दिले भन्नाट उत्तर, म्हणाला ‘भाऊ तर…’

‘भाईजान’ सलमान खानबाबत विचारलेल्या प्रश्नावर शाहरुखने दिले भन्नाट उत्तर, म्हणाला ‘भाऊ तर…’

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा कायमच आपल्या चाहत्यांशी सोशल मीडिया माध्यमातून संपर्क साधत असतो. यावेळीही त्याने आपल्या चाहत्यांसाठी वेळ काढत ट्विटरच्या माध्यमातून दिलखुलास गप्पा मारल्या. अनेक मजेदार प्रश्न काही चाहत्यांनी बादशाहला विचारल्यावर त्या प्रश्नांची उत्तरेदेखील अगदी मजेशीर स्वरुपात त्याने दिली.

एका चाहत्याने तर शाहरुखला विचारले “तुम्ही बाथरूममध्ये असा काय करता की, तुम्हाला एवढा वेळ लागतो?” यावर किंग खानने लिहिले की, ‘मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, तो विडिओ बघून तुमची उत्सुकता आणि शिकण्याची तीव्र इच्छा हृदयस्पर्शी ठरणार आहे.’

तसेच सलमान खानबद्दलही एक प्रश्न एका चाहत्याने विचारला, “सलमान भाईसाठी काही शब्द? तुम्ही दोघांनीही ‘पठाण’ चित्रपटासाठी एकत्र शूट केले आहे.” यावर शाहरुखने प्रत्युत्तर देऊन लिहिले की, “नेहमीप्रमाणेच…भाऊ तर भाऊ आहे.”

एका युजरने विचारले, “पुढील चित्रपटाबद्दल माहिती द्या.” त्यावर शाहरुख म्हणाला “सध्या अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच आमचेही चित्रपट प्रदर्शित होतील.”

‘पठाण’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून शाहरुख, सलमानसोबत दीपिका पदुकोण तसेच जॉन अब्राहम या चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग जगभर अनेक ठिकाणी सुरू आहे. चित्रपटाचे शूटिंग करताना बुर्ज खलिफा या जगप्रसिद्ध इमारतीचादेखील त्यात समावेश असणार आहे. हा चित्रपट उत्तम आणि अ‍ॅक्शनबाज बनवण्यासाठी अनेक वेगळे प्रयत्न केले जात आहेत. या चित्रपटात सलमानने एक छोटीशी भूमिका साकारली असून यासाठी त्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये शूट केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे निधन; विमानतळावर होता सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत

-‘सिंड्रेला’ बनत अभिनेत्री निया शर्माची साराला टक्कर; फोटो पाहून नेटकरी म्हणाले ‘जो नियासे जले…’

-राजू, शाम आणि बाबुराव पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज, ‘हेरा फेरी’चा तिसरा पार्ट लवकरच होणार रिलीझ

हे देखील वाचा