Tuesday, July 9, 2024

एका बारमध्ये वेटर म्हणून करायचा काम, चंद्रकांता मालिकेने असे बदलले ‘या’ अभिनेत्याचे आयुष्य

चित्रपट सृष्टीमध्ये नायकाला जेवढी प्रसिद्धी मिळते, तेवढीच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी खलनायकाला मिळते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी खलनायकाची भूमिका साकारली, पण त्यातील अगदी काहीच अभिनेते आपली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर बिंबवू शकले आणि यातीलच एक अभिनेता म्हणजे शाहबाज खान. शाहबाज खान यांनी ‘राजु चाचा’, ‘चल मेरे भाई’ आणि ‘बादल’ या चित्रपटात काम केले. पण त्यांना खरी ओळख ही चंद्रकांता या मालिकेमधून मिळाली. या मालिकेतील त्यांच्या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. 90 च्या दशकातील चंद्रकांता ही एक लोकप्रिय मालिका होती. या मालिकेने केवळ शाहबाज यांना केवळ ओळख दिली नाही, तर रातोरात त्यांना हीरो बनवले होते.

यानंतर शाहबाज यांच्याकडे अनेक चित्रपटाच्या आणि मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. चंद्रकांता मालिकेआधी शाहबाज यांनी चित्रपटात काम देखील केले होते. परंतु चंद्रकांता ही मालिका त्यांच्या करियरमधील टर्निंग पॉइंट ठरली आणि इथूनच यशाची सुरुवात केली. नंतर त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप यश पाहायला मिळाले.

शाहबाज खान यांच्या चाहत्यांना कदाचित ही गोष्ट माहिती नसेल की, चित्रपट सृष्टीमध्ये येण्याआधी शहाबाज हे एका बारमध्ये काम करत होते. शाहबाज खान हे नावाजलेले शास्त्रीय संगीतकार उस्ताद अमीर खान यांचा मुलगा आहे. परंतु घरात आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी देखील पैशाची चणचण भासू लागली, आणि काहीच काम न मिळाल्याने त्यांनी बारमध्ये काम करण्यास सुरुवात केली. शाहबाज यांना ‘टिपू सुलतान’ या मालिकेतून त्यांच्या करियरमधील पहिला ब्रेक मिळाला.

चित्रपट सृष्टीमध्ये आल्यावर शाहबाज यांना अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागले. पण त्यानंतर त्यांना चंद्रकांता या मालिकेमधून जे काही प्रेम आणि जी काही लोकप्रियता मिळाली त्याची तुलना कशाचीच करू शकत नाही. यानंतर त्यांनी ‘बेताल पच्चीसी’ या मालिकेमध्ये काम केले. शाहबाज खाने यांनी अमिताभ बच्चन, आमिर खान, ऋतिक रोशन, अजय देवगन यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

शाहबाज यांच्याकडे चित्रपटांच्या जास्त ऑफर येत नव्हत्या. तरी पण त्यांनी मेहनत करून त्यांचे काम केले. मागील काही दिवसात यांच्यावर छेडछाडीचा आरोप लागला होता. त्यांनी एका किशोरवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर लागला होता. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियाद्वारे असं काही झालं नसल्याची माहिती दिली. तसेच त्यांना निर्दोष सिद्ध केले.

हे देखील वाचा