Tuesday, July 9, 2024

अंकिता लोखंडेच्या लग्नाबद्दल असं काय बोलला शाहीर शेख? जे ऐकून अभिनेत्रीला करावे लागले त्याला गप्प

लग्न, परिवार, संसार या सर्व गोष्टींना भारतामध्ये एक वेगळे महत्व आहे, एक वेगळे स्थान आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार कोर्ट मॅरेज करतात, तर काही जण शास्त्रशुद्ध पद्धतीने सात फेरे घेतात. प्रत्येकाचे आपल्या लग्नाविषयी एक वेगळे स्वप्न असते. अशात अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आली आहे. अंकिता ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या लग्नावरून सुरु असलेल्या चर्चेमध्ये ती शाहीर शेखला चांगलीच ओरडली होती. त्याने तिच्या लग्नावर एक कमेंट केली होती. या कमेंटमुळेच त्याला अंकिताचा ओरडा खावा लागला.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता पुन्हा एकदा या मालिकेमध्ये झळकणार आहे. या मालिकेचे दुसरे पर्व म्हणजेच ‘पवित्र रिश्ता २’ सुरू होणार असून, शाहीर या मालिकेमध्ये तिचा सह कलाकार आहे. सध्या हे दोघेही आपल्या मालिकेचे प्रमोशन करत आहेत. प्रमोशन वेळी अभिनेत्रीला विचारण्यात आले की, या मालिकेनंतर तू काय करणार आहेस. त्यावर ती उत्तर देत म्हणत होती, “या मालिकेनंतर माझ्या जवळ काहीच काम नाहीये.” तेव्हा शाहीरमध्येच तिचा शब्द कापत म्हणतो की, “राहूदे यार तुझं, तर लग्न होणार आहे.” (Shaheer Sheikh reveal about Ankita wedding plan she tell him to shut up)

अंकिता म्हणाली ‘तू पागल आहेस का?’
शाहीरचे हे शब्द ऐकून ती थोडी हडबडली आणि त्याला म्हणाली, “तू पागल आहेस का? गप्प बस… नाही नाही असे काही नाही.” यानंतर, शाहीर आपला मुद्दा स्पष्ट करत म्हणाला की, “अरे मला माहित नाही … मी जे सांगितले ते विसरून जा.” यावर अंकिता म्हणते, “मी काही करणार नाहीये. होय, पण फेब्रुवारीपासून मी काहीतरी सुरू करू शकते.”

काही दिवसांपूर्वी अंकिताने एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, “लग्न ही खूप छान गोष्ट आहे. हो… मी सुद्धा माझ्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे, जे की लवकरच होऊ शकते. मला जयपूर – जोधपूर, राजस्थानी लग्न खुप आवडतात. पण अजून मी लग्नाविषयी काही ठरवलेलं नाही.”

विक्कीचे मानले मनापासून आभार
अंकिताने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये धन्यवाद म्हणत लिहिलं होत की, “विक्की तू जी काही साथ मला दिली आहे त्यासाठी तुला माझा सलाम आहे. मी तुला वचन देते की, मी तुला ते सगळं सुख देईल ज्याचा तू हक्कदार आहेस. प्रत्येक माणूस अशी परिस्थिती नीट नाही सावरू शकत जशी तुम्ही सावरली. धन्यवाद सर्वच गोष्टींसाठी.” अंकिता आणि विक्की गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला खूप ट्रोल केले होते. परंतु त्यावेळी तिला विक्कीने खूप साथ दिली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुराग यांनी दिले अनेक सुपरहिट चित्रपट, मात्र अपयशी ठरले वैयक्तिक आयुष्य; वाचा त्यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा नैतिक करतोय त्याचा वाढदिवस साजरा, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्दप्रवास

-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’

हे देखील वाचा