Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

शाहिद आणि मीराची जोडी पुन्हा एकदा आली चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवा फोटो

‘कबीर सिंग’ (kabir singh) या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळवलेल्या शाहिद कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील ‘चॉकलेट बॉय’ या नावाने देखील तो ओळखला जातो. शाहिदवर तरुणी अक्षरशः फिदा आहेत. शाहिद अनेक तरुणींचा क्रश आहे. पण मात्र हाच शाहिद त्याच्या पत्नीसाठी फिदा आहे.

हे जोडपं सोशल मीडियावर फार सक्रिय नसतं, पण जेव्हा ही जोडी एखादा फोटो पोस्ट करत असते तेव्हा मात्र यांच्या फोटोच्या पोस्टवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. असाच एक फोटो त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. (shahid kapoor and mira rajput new photo viral on social media)

हिवाळ्यात सहसा कोण बाहेर निघत नाही. तसेच हिवाळ्यात सूर्यस्नान करायला देखील कोणाला आवडत नाही. पण अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor)  आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (mira rajput) हे व्हिटॅमिन डीच्या सर्वोत्तम स्तोत्रांचे डोस घेत आहेत. अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. मीराने इंस्टाग्रामवर शाहिदसोबत ‘सनकिस्ड’ फोटो शेअर केला, ज्यामध्ये शाहिद मीराकडे झुकलेला दिसत आहेत.

शाहिद आणि मीराच्या या फोटोला आणि त्यांच्या प्रेमाला त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि भरपूर कमेंट केले आहे. त्यांच्या एका चाहत्याने कमेंट केलं की, “तुम्ही दोघे सोबत खूप छान दिसत आहेत.” तर दुसरीकडे आणखी एका चाहत्याने “तुमच्या दोघांची जोडी मस्त आहे,” अशी कमेंट केली आहे.

शाहिद आणि मीरा २०१५ मध्ये लग्नबंधनात अडकले आणि आता ते दोघे २ मुलांचे आई-वडील आहेत. त्यांची मुलगी मिशा ही ४ वर्षांची आहे, तर मुलगा जैन हा २ वर्षांचा आहे. हे जोडपं या वर्षी आपल्या नवीन घरी स्थलांतर होण्यासाठी तयारी करत आहेत.

हेही वाचा :

‘हे’ आहेत आलिया भट्टच्या करिअरला कलाटणी देणारे सुपरहिट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

तेलगू चित्रपटांमध्ये महेश बाबूच्या नावाचे चालते नाणे, ‘या’ रिमेकने सलमानच्या करिअरला दिली नवी गती

‘सगळे श्रेय माझे कपडे आणि हेअरस्टाइलला दिले’ म्हणत ‘रंगीला’ चित्रपटाबाबत उर्मिला मातोंडकरने केले स्फोटक विधान

 

हे देखील वाचा