बॉलिवूडमध्ये अनेक कपल आहेत जे फॅन्सच्या मनावर राज्य करतात. अनेक कपल आहेत जे फॅन्ससाठी रोल मॉडल आहेत. या सर्व कपलच्या यादीत यशस्वी आणि लोकप्रिय कपल म्हणून सर्वात आधी नाव येते ते, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे. शाहिद आणि मीरा इंडस्ट्रीमधील क्युट आणि प्रसिद्ध कपलच्या यादीत सर्वात वर येतात. फॅन्स सतत त्यांना सोशल मीडियावर आणि मीडिया सतत त्यांना विविध ठिकाणी फॉलो करताना दिसते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी मीरा सतत काही ना काही पोस्ट करताना दिसते. तिचे फोटो, मुलांचे फोटो, वेगवेगळ्या अपडेट यामुळे फॅन्सला त्यांच्या आयुष्यातील विविध गोष्टींबद्दल माहिती देखील मिळत असते.
मीरने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती आणि शाहिद कपूर दिसत असून, ते एका अंडर कन्स्ट्रक्शन घरामध्ये उभे आहेत. मीराने हा फोटो पोस्ट करताना लिहिले, “वन स्टेप एट अ टाइम” अर्थात “एका वेळी एक पाऊल.” मीराने पोस्ट केलेला हा फोटो शाहिद आणि मीराच्या नवीन घराचा असून, सध्या या घराचे काम खूप जोरात सुरू आहे. या फोटोमध्ये पाहिले तर शाहिद आणि मीरा घराच्या आत असणाऱ्या जिन्यावर उभे आहेत. त्यांचे हे नवीन घर एक डुप्लेक्स अपार्टमेंट असून, हा जिना दोन फ्लोरला जोडणारा आहे.

या फोटोमध्ये मीरा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये क्लासी दिसत आहे, तर शाहिद कपूर ग्रे-ग्रीन रंगाचं कॅज्युअल लूकमध्ये जिन्यावर उभा आहे. शाहिद आणि मीराने हे घर २०१८ साली खरेदी केले होते. त्यांच्या या घरातून अरबी समुद्राचा शानदार नजारा पाहायला मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार या दोघांचे हे नवीन घर ४२ आणि ४३ व्या मजल्यावर असून त्याची किंमत ५६ कोटी इतकी आहे.
हे घर सुमारे ४००० स्क्वेयर फुटाचे असून, शाहिद आणि मीरा नेहमी या घराला पाहायला येत असतात. सध्या शाहिद आणि मीरा त्यांच्या दोन मुलांसोबत जुहूमध्ये राहत असून, हे घर तयार झाले की ते इकडे राहायला येणार आहे.
शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास तो लवकरच ‘जर्सी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा एका तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शाहिदसोबत या चित्रपटात पंकज कपूर देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-किंग खानच्या लाडक्या मुलाला ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीचा पाठिंबा; म्हणाली, ‘तो चांगला मुलगा आहे…’
-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन