Monday, April 15, 2024

केवळ मीरा राजपूतच्या नाही, तर अनेकदा शाहिद कपूर पडलाय प्रेमात, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या कष्टाने या इंडस्ट्रीमध्ये त्याचे नाव कमावले आहे. त्याला रोमँटिक अंदाजात पाहायला सगळ्यांना खूप आवडले होते. परंतु ऍक्शन थ्रिलर चित्रपटात देखील त्याला चांगलाच परिचय मिळाला. त्याला त्याच्या या भूमिकेसाठी अनेक अवॉर्ड देखील मिळाले आहेत. शाहिद त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जेवढा चर्चेत असतो. तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. तो त्याची पत्नी मीरा राजपूतसोबत अनेकवेळा त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. मीरा ही चित्रपटसृष्टीतील नसली, तरी देखील ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्या दोघांची केमेस्ट्री देखील सगळ्यांना खूप आवडते. परंतु अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, शाहिद एकदा नाहीतर अनेकवेळा प्रेमात पडला आहे.

Photo Courtesy: Instagram/shahidkapoor

शाहिदच्या अफेअरच्या चर्चा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळाल्या आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? या रोमान्स किंगल‌वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी प्रेम झाले होते. हो अगदी बरोबर वाचलतं. याचा खुलासा खुद्द शाहिद कपूरने त्याच्या एका मुलाखतीत केला होता.

Photo Courtesy: Instagram/shahidkapoor

शाहिद कपूर एकदा सिमी ग्रेवलच्या चॅट शोमध्ये गेला होता. या शोमध्ये त्याला विचारले होते की, तो किती वेळा प्रेमात पडला आहे. यावर त्याने अगदी मजेशीर पद्धतीने उत्तर दिले होते. शाहिदने सांगितले होते की, तो अगदी कठीण परिस्थितीत आहे. तो म्हणाला की, “मी याचे उत्तर नाही देऊ शकत. कोणताही मुलाला विचारला जाणार हा एक खतरनाक प्रश्न आहे.” त्याने सांगितले की, “मी जेव्हा कोणत्याही मुलीला भेटतो तेव्हा मी तिच्या प्रेमात पडतो. भलेही मी तीन वर्षाचा का असेना, परंतु तेव्हा माझे प्रेम खरे होते.”

शाहिदसोबत जेव्हा मीरा राजपूतची पहिली भेट झाली होती तेव्हा ती खूप घाबरली होती. त्यावेळी मीराने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. मीरा जेव्हा शाहिदला पहिल्यांदा भेटली, तेव्हा तो ‘उडता पंजाब’ या चित्रपटाची शूटिंग करत होता. त्यावेळी त्याचा लूक खूप डेंजर होता. त्यावेळी केवळ मीरा नाही तर तिच्या घरातले देखील त्याचा लूक पाहून घाबरले होते.

Shahid-Kapoor-And-Mira-Rajput
Photo Courtesy: Instagram/mira.kapoor

शाहिदने या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यावर त्याचे केस कापले. त्यानंतर तो एकदम स्मार्ट बनून मीराच्या घरच्यांना भेटला तेव्हा सगळ्यांना तो खूप आवडला. आता जेव्हा एवढा हॅण्डसम मुलगा असल्यावर तिच्या घरातले तरी का बरं नाही म्हणतील? त्यांच्या बोलण्यानंतर ३-४ वेळा त्यांची भेट झाली. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी घरच्यांच्या परवानगीने लग्न केले. शाहिद आणि मीराला दोन मुले आहे. मुलाचे नाव जैन कपूर ते मुलीचे नाव मिशा कपूर आहे. त्याच्या वैवाहिक आयुष्यात तो खुश आहे. याची झलक तो नेहमीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देत असतो.

हेही वाचा :

हे देखील वाचा