होळीच्या सणानिमित्त सगळे कलाकार सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहेत. अभिषेक बच्चन, करीना कपूर, मलायका अरोरा या बॉलिवूड स्टार्स सोबत अभिनेता शाहिद कपूरने देखील त्याच्या चाहत्यांसाठी होळीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूत हिच्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघांचा रोमँटिक आणि मस्तीचा अंदाज दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.
शाहिद कपूरने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने ‘हॅप्पी होली’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाहिद आणि मीराच्या गालाला रंग लागलेला दिसत आहे.
शाहिद कपूरच्या या व्हिडिओवर सगळेजण कमेंट आणि लाईक्स करताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडियोवर शाहिदचा छोटा भाऊ खट्टर याने देखील एक हार्ट इमोजी पोस्ट करून कमेंट केली आहे. या सोबतच एका युजरने कमेंट केली आहे की, “जो इस जोडी से जले, जरा साईड से चले.”
शाहिद कपूरच्या या व्हिडिओला सगळे चाहते खूपच प्रेम देत आहे आणि कमेंट करून त्याला होळीच्या शुभेच्छा देत आहे. शाहिद कपूर शेवटचा त्याच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर झाला होता. तसेच तो त्याच्या आगामी चित्रपट ‘जर्सी’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर त्याने काही दिवसापूर्वी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा










