बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. सोशल मीडियावर त्यांच्या फोटो आणि व्हिडिओला खूप प्रेम मिळते. मीरा ही चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने कोणतीही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर ती वेगाने व्हायरल होत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
शाहिद कपूरने सोशल मीडियावर नुकतेच मीरासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मीराने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तर शाहिद शर्टलेस दिसत आहे. त्याने डोळ्यांवर एक गॉगल लावलेला दिसत आहे. (Shahid Kapoor share a video with her wife on social media)
तसेच व्हिडीओमध्ये शाहिद हसताना दिसत आहे तर मीरा कपडे घालताना दिसत आहे. यावर शाहिद लपून व्हिडिओ काढत आहे. परंतु नंतर मीराला समजते की तो व्हिडिओ काढत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आता ३ लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत.
हा फोटो शेअर करून शाहिदने “लिजेंड” असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. हा व्हिडिओ पाहून हे समजत आहे की, हा व्हिडिओ त्यांच्या मालदीवच्या सुट्यांमधील आहे. मागच्याच आठवड्यात ते परत आले आहेत. त्यांचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
ते त्यांची मुल मिशा आणि जैनसोबत मालदीवला गेले होते. तेथील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ मीराने सोशल मीडियावर शेअर केले होते. शाहिदने आता शेअर केलेल्या या व्हिडिओवर देखील त्यांचे चाहते प्रेम दर्शवत आहे. शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो याआधी ‘कबीर सिंग’ या चित्रपटात दिसला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
-दुःखद बातमी! प्रसिद्ध संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास










