Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड शाहिदने बेडरूममधील फोटो केला शेअर, पाहून पत्नी मीरा म्हणाली, ‘तू स्वत:ला संकटात टाकत आहेस, तो व्हिडिओ…’

शाहिदने बेडरूममधील फोटो केला शेअर, पाहून पत्नी मीरा म्हणाली, ‘तू स्वत:ला संकटात टाकत आहेस, तो व्हिडिओ…’

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ते दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. दोघांचा रोमँटिक अंदाज त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून आपण नेहमीच पाहत असतो. मीरा तिच्या कुटुंबासोबत नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. त्यामुळे त्यांच्यातील बॉंडिंग लक्षात येते. अशातच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

शाहिद कपूरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याच्या बेडरूममधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या पत्नीला मस्तीच्या अंदाजात प्रश्न विचारतो. यावेळी मीरा त्याला म्हणते की, “काही दिवस वाट बघ, मग तुला सगळं काही समजेल.” (Shahid Kapoor shared his bedroom photo after seeing wife mira rajput got shock )

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, शाहिद कपूर त्याच्या बेडरूममध्ये बेडवर बसलेला दिसत आहे. त्याच्या बेडवर अनेक उशा ठेवलेल्या दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “तुला बेडवर एवढ्या उशा का आवडतात?” हा फोटो त्याने मीराला मेन्शन केला‌ आहे.

Photo Courtesy Instagramshahidkapoor

शाहिद कपूरने शेअर केलेला हा फोटो मीराने रिपोस्ट करून उत्तर दिले आहे. तिने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “तू स्वतःला एक खूप मोठ्या संकटात टाकत आहेस, तो व्हिडिओ लवकरच समोर येईल.”

Photo Courtesy Instagrammirakapoor

याआधी शाहिदने मीरासोबत‌ बीचवरील एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये मीरा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती, तर शाहिद शर्टलेस दिसत होता. या व्हिडिओमध्ये मीरा टॉप नीट करत असताना शाहिद लपून तिचा व्हिडिओ काढत होता. हा व्हिडिओ त्यांच्या मालदीव व्हेकॅशनचा होता. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो याआधी ‘कबीर सिंग’ या चित्रपटात दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’

-सोनम कपूर ते करीना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींना आवडतात मसाबाने डिझाईन केलेले कपडे, पाहा तिची स्टाईल

-‘सलमान एकटा असून, त्याला खास व्यक्तीची गरज आहे’, म्हणत महेश मांजरेकरांनी केले दबंग खानच्या लग्नावर वक्तव्य

-असे काय झाले की, आपल्याच पोटच्या मुलाला विसरली जिनिलिया देशमुख? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा