Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड सना कपूर आणि मयंक पाहवा अडकले लग्नबंधनात, शाहिद कपूरने बहिणीला दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

सना कपूर आणि मयंक पाहवा अडकले लग्नबंधनात, शाहिद कपूरने बहिणीला दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

दिग्गज अभिनेता पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी सना कपूर आणि मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांचा मुलगा मयंक यांचे लग्न झाले. सनाने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून ती बातमी दिली आहे. त्यांनी महाबळेश्वरमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नात त्यांचे काही नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सना ही शाहिद कपूरची बहिण आहे. त्याने देखील त्याच्या बहिणीच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.

शाहिद कपूरने इंस्टाग्रामवर सना कपूरसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहिद मरून जॅकेट आणि कुर्ता घातलेला दिसत आहे. सनाने लेहंगा घातला आहे. तिने मिनिमल मेकअप केला आहे. दोघेही सोबत फोटोसाठी पोझ देत आहेत.

त्याने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “वेळ कशी बदलून केली आणि छोटी बित्तो आता नवरी झाली. खूप लवकर मोठी झाली. एक अद्भुत नवीन विषयाची इमोशनल सुरुवात. डियर सना तुला आणि मयंकला नेहमीच सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकत राहण्यासाठी शुभेच्छा.”

तसेच सनाने देखील तिच्या लग्नाचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये क्लोजअप आहे. त्या फोटो सना आणि मयंक एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत. दुसऱ्या फोटोत सना आणि मयंक एकमेकांच्या समोर उभे आहेत.

सनाने हे फोटो शेअर करून हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. या फोटोवर शाहिद कपूरची पत्नी मिरा कपूरने कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा