बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आपल्या कुटुंबासोबत मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यास गेला होता. मालदीवमधील खूप सारे फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल देखील झाले आहेत. सुट्ट्या संपवून तो परत आपल्या कुटुंबासोबत मुंबईत आला असून मुंबईत पाऊल ठेवल्या ठेवल्या शाहिदची पत्नी मीरा ही तिच्या आऊटफिटमुळे ट्रोल झाली आहे.
पॅपराजींनी शाहिदला त्याच्या कुटुंबासोबत विमानतळावर स्पॉट केले. यादरम्यान शाहिदने काळ्या रंगाची जॉगर आणि काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते, तर मीराने काळ्या रंगाची शॉर्ट आणि त्याच रंगाचे स्वेटशर्ट परिधान केले होते. या शॉर्टच्या उंचीमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
एअरपोर्टवरती कारच्या दिशेने जाताना तिने आपली मुलगी मीशाचा हात पकडून चालताना दिसली. तिच्या हातात एक बॅग देखील होती. तसेच तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला आहे. या फोटोला पाहून एका चाहत्याने लिहिले की, ‘किती शॉर्ट घातले आहे, काही घातलं आहे की नाही’, तर दुसऱ्याने लिहिले की, ‘वाह! हिचे कपडे दिवसेंदिवस हळू हळू छोटे व्हायला लागले आहेत’.
तत्पूर्वी मीराने मालदीवमधला तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये पाण्यात पोहत होती. हा व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिले की, ‘मी व्हिटामिन सी घेत आहे’. यापूर्वीही तिने मालदीवमधील काही सुंदर असे फोटो शेअर केले होते. बॅकग्राऊंडला मालदीवचा विलोभनीय निसर्ग आणि त्यात मीराचे आकर्षक फोटो. तिथे ती कधी समुद्र किनाऱ्यावर योगा करताना दिसली तर कधी पाण्यात मस्ती करताना दिसली.
मीरा तशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, आणि आपल्या चाहत्यांशी आणि फॉलोअर्सशी बोलत राहते. एवढेच नव्हे तर ती तिच्या चाहत्यांसोबत ब्युटी टिप्सही शेअर करते. ती कधीही ट्रोल्सला प्रतिसाद देत नाही. नुकत्याच झालेल्या करवा चौथ सणाच्या वेळी मीरा अतिशय सुंदर पारंपरिक लूकमध्ये तयार झालेली दिसली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ
-जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, प्रदर्शनाची तारीखही जाहीर