Wednesday, June 26, 2024

का होतिये शाहिदची बायको मीरा राजपूतची सर्वत्र चर्चा?

बॉलिवूड जगात जितकी ओळख आणि प्रसिद्धी अभिनेत्यांची असते, तेवढीच ओळख आणि चर्चा त्यांच्या पत्नीची बघायला मिळते. या सगळ्यामध्ये मीरा राजपूत हे नाव हल्ली मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्याला कारणही तसेच आहे.

शाहिद कपूर चित्रपटांमुळे जेवढा गाजला, तेवढाच तो करीना कपूरसोबतच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. शाहिद कपूरने अनेक मुलींच्या मनावर राज्य केले असेल, पण शेवटी लग्न केले ते मीरा राजपूतसोबत. मीरा ही बॉलिवूड क्षेत्रातली नसून अलीकडेच तिचे मन या क्षेत्राकडे वळते आहे का असे दिसत आहे. मीरा फॅशन ते स्टाईल या प्रत्येक गोष्टीसाठी चर्चेत आहे. मीराचे फोटो नेहमीच प्रसिद्ध होत असतात. अलीकडेच मीराने तिचा एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खुप प्रसिद्ध होत आहे.

पूर्वी मीरा राजपूत ही सोशल मीडियावर फार सक्रिय नसायची, परंतु ती आता तिचे जूने फोटो सोशल मीडियावर  टाकताना दिसत आहे. मीरा राजपूत हिने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो फोटो कोविड १९च्या आधीचा आहे. मीरा ने ग्रीसमधल्या मायकोनोस या सुंदर अश्या ठिकाणाहून स्वतःचा एक फोटो टाकला आहे.  मीराने शेअर केलेल्या फोटोत ती पांढर्या पोशाखात आणि हातात टोपी घेतलेली दिसत आहे. मीराने चष्मा घातला आहे. या लूकमध्ये मीरा खूप ग्ल्यामरस दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. या फोटोला कॅप्शनमध्ये मीराने मायकोनोस २०१७ असे लिहीले आहे.

मीरा आणि शाहिद यांच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. दोघेही आता दोन मुलांचे पालक आहेत, त्यांना एक मुलगी मीशा आणि मुलगा जैन आहे. शाहिद आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत बराच वेळ घालवितो. शाहिद बर्‍याचदा आपल्या पत्नीबरोबर फिरताना दिसतो.

शाहिद कपूरच्या व्यावसायिक जीवनाविषयी बोलताना तो लवकरच ‘जर्सी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असेल, हा साऊथच्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर दिसणार आहेत. शाहीदने सराव सत्राचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

हे देखील वाचा