दिवाळीत सगळेजण फटाके वाजवून दिवाळीचा आनंद घेत असतात. परंतु या फटाक्यांमुळे वातावरण दूषित होऊन हवेचे प्रदूषण होते. एकीकडे आपण आनंद साजरा करत असतो, परंतु दुसरीकडे मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य विसरत असतो. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. हे वायू प्रदूषण पाहून अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत खूप दुःख झाली आहे. तिने तिचे हे दुःख सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. मीराने दिल्लीमध्ये होत असणाऱ्या प्रदूषणावर तिची नाराजी व्यक्त केली आहे.
मीरा लग्नाआधी दिल्लीमध्ये राहत होती. तिथेच ती लहानाची मोठी झाली आहे. तिने दिवाळीनंतर दिल्लीच्या एअर क्वालिटीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, “पण का? हे फटाके कोण फोडत आहे? तेच सगळे हे फटाके फोडू नका अशी विनंती देखील करत आहे.”
मीराने इंस्टाग्राम स्टोरीला धुराने वेढेलेल्या शहराच्या आकाशाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “हे माझे घर असूचं शकत नाही. कृपया तुमचे काहीतरी योगदान द्या. फटाके फोडू नका. तुमचा कचरा एका जागी गोळा करा आणि त्या लोकांना मदत करा जे जागरूकता पसरवतात.”
दिवाळीच्या एक दिवसानंतर म्हणजेच शुक्रवारी (५ नोव्हेंबर) दिल्लीमधील हवा मोठ्या प्रमाणात दूषित झाली. माध्यमातील वृत्तानुसार फटाके फोडल्यामुळे हवेची क्वालिटी खराब झाली आहे. त्यामुळे त्याचा त्रास वातावरणातील घटकांना म्हणजेच पशू, पक्षी यांना मोठ्या प्रमाणात होतो. तसेच मानवी जीवनावर देखील याचा परिणाम होतो. मीरा पर्यावरण प्रेमी असल्याने तिने याबाबत हळहळ व्यक्त केली आहे आणि जागरूकता पसरविण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शाहिदने लपून काढला मीराचा कपडे घालतानाचा व्हिडिओ, बघण्यासारखी होती पत्नीची रिऍक्शन
-‘हळू हळू कपडे छोटे होत आहेत’, म्हणत नेटकऱ्यांनी कपड्यांवरून केले मीरा राजपूतला ट्रोल