पंजाबी मॉडेल आणि गायक शहनाझ गिल हिला रिऍलिटी शो बिग बॉस 13 मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. सिद्धार्थ शुक्लासोबत रोमांस करण्यापासून ते मजा-मस्करी करण्यापर्यंत शहनाज गिल अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. अलीकडेच लोकप्रिय संगीत निर्माता यशराज मुखाते यांनी शहनाजच्या संवादावर एक रॅप गाणे तयार केले होते, जे आजकाल प्रत्येकाच्या तोंंडात असते. बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळवणारी शहनाज या शोमध्ये येण्यापूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यात बर्याच वादात सापडली आहे. चला तर मंडळी आज आपण पाहूया पंजाबच्या कॅटरिना कॅफ शहनाज गिलचा प्रवास-
मॉडेलिंगद्वारे झाली होती करिअरची सुरूवात
शहनाज गिलने मॉडेलिंगद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली. काही ब्यूटी कॉन्टेंटचा भाग झाल्यानंतर, शहनाजला 2015 मध्ये गुरविंदर बरारच्या ‘शिव दी किताब’ आणि कंवर चहल यांच्या ‘माझे दी जट्टी’ म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यानंतर ही अभिनेत्री पंजाबी संगीत इंडस्ट्रीचा एक सुप्रसिद्ध चेहरा बनली.
हिमांशीने शहनाजवर केले होते अपमानास्पद वक्तव्य
बिग बॉस 13 मध्ये दिसण्याआधी परस्पर शत्रुत्वामुळे हिमांशी खुराना आणि शहनाज गिल बरेच वादात सापडले होते. शहनाज गिलने स्नॅपचॅटवर लाइव्ह जाऊन हिमांशी खुरानाचे ‘आई लाईक इट’ हे गाणे आतापर्यंतचे सर्वात वाईट गाणे असल्याचे सांगितले होते. शहनाजने गाण्याबद्दल वाईट बोलताना हिमांशीसाठीही बऱ्याच अपशब्दांचा वापर केला होता. त्याला उत्तर म्हणून हिमांशी खुरानाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह जाऊन तिला चांगलेच प्रतिउत्तर दिले होते.
हिमांशीने बिग बॉसमध्ये सांगितले होते की शहनाजच्या प्रियकरने तिला रस्त्यावर सोडल्यानंतर तिने शहनाजची मदत केली होती. हिमांशी शहनाझला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिच्या टीमला तिला खायला द्यायला सांगितले. याच्या काही दिवसांनंतरच शहनाजने तिच्याबद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद बोलणे सुरू केले. त्यावेळी शहनाजला उत्तर देताना हिमांशी म्हणाली, ‘जेव्हा तुझा प्रियकर तुला रस्त्यावर सोडून गेला, तेव्हा मी तुझी मदत केली, पण तू कृतज्ञ आहेस. चेटकीणसुद्धा सात घर सोडून प्रहार करते, कोणत्या शाळेत शिकली आहेस तु?’
https://www.youtube.com/watch?v=-4kh1Pjse1U&feature=emb_imp_woyt
हिमांशीच्या व्हिडिओनंतर दोघींनी एकमेकांवर सतत अपमानास्पद वक्तव्य करण्यास सुरवात केली. शहनाझने पुढच्या व्हिडिओत म्हटले होते, ‘क्लासिक आणि चीपमध्ये खूप फरक पडतो. येथे चीप तू आहेस, कारण मी फक्त एका गाण्याबद्दल बोलले, पण तू मेंटल टॉर्चर करून नीच वागलीस. यामुळे मी क्लासी आहे आणि तु चीप आहेस.
हिमांशीमुळे शहनाजने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
शहनाज गिलचे वडील संतोष गिल स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, वादाच्या वेळी हिमांशीने शहनाजवर इतका मानसिक अत्याचार केला की ती अस्वस्थ झाली आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर या दोघीे पुन्हा एकदा वादात सापडल्या होत्या.
शहनाजचे वडील संतोष यांच्या वक्तव्यानंतर हिमांशी सोशल मीडियावर म्हणालीे, ‘तुमच्या मुलीने माझ्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल तर क्षमस्व. परंतु आपण आपल्या मुलीलाही समजवा की स्वत:च कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची आणि स्वत:च अस्वस्थ व्हायचं. आपल्या मुलीने कॅनडाच्या मुलाखतीत सांगितले होते की कॉन्ट्रोवर्सी केल्यामुळे मला काम मिळते तर तुम्ही मुलाखत जरा विचारपूर्वक द्या’.
Agar apki Beti ne meri viah se suicide attempt kia to sry but app apni Beti ko ye bhi smjyaiye ki khud hi controversy kro fir khud disturb bhi ho jao . jab ki apki Beti Canada k interview me boli thi ki mujhe controversy ki vjaa se kaam mil raha hai .app soch smj kr interview do
— Himanshi khurana (@realhimanshi) January 18, 2020
यशराज मुखाते यांच्या रॅप सॉन्ग मुळे झाली होती व्हायरल
‘रसोड़े में कौन था’चे व्हिडिओ निर्माते यशराज मुखाते यांनी शहनाज गिलचा संवाद ‘क्या करू मैं मर जाऊ’ यावरून रॅप गाणे तयार केले होते. डिसेंबर 2020 मध्ये हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता आणि आतापर्यंत 8 दशलक्षांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आल्यानंतर पुन्हा एकदा शहनाजची जादू देशभर पसरली. बिग बॉस नंतर शहनाज ‘भुला दूंगा’, ‘कह गई सॉरी’, ‘शोना- शोना’, ‘कुर्ता पजामा’ आणि ‘वादा है’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे.