Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

बॉलिवूडच्या सुपरहिट जोडप्यांमध्ये शाहरुख खान आणि काजोल यांची नावे आवडीने घेतली जातात. शाहरुख-काजोल खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत आणि शूटिंग दरम्यानही ते दोघे खूप मजा करत असतात. एकदा काजोलने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा शेअर केला होता. चित्रपटाच्या सेटवर रोमँटिक सीनच्या दरम्यान शाहरुखने असे काहीतरी केले होते की, जे पाहून काजोल देखील आश्चर्यचकित झाली.

वास्तविक, शाहरुख खान आणि काजोल यांना चित्रपटात एक रोमँटिक सीन शूट करायचा होता, ज्याच्या शूटिंगसाठी त्यांना खूप अडचणी सहन कराव्या लागल्या. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ही हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट प्रेमकथा मानली जाते. याची सर्व गाणीही ब्लॉकबस्टर होती आणि सीनही उत्कृष्ट होते.

या चित्रपटात शाहरुख आणि काजोलचा बेडवरचा एक सीन आहे. यासंदर्भातील एक मजेशीर किस्सा काजोलने सांगितला होता. आदित्य चोप्राला हा देखावा स्टीमी बनवायचा होता, पण शूटींग करण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. काजोल म्हणाली होती की, जेव्हा ते या सीनचे शूटिंग करत होते, तेव्हा त्यांना हसू येत होते. या सीनसाठी त्यांना बरेच रिटेक द्यावे लागले होते.

या सीन दरम्यान शाहरुखला गंभीर डायलॉग बोलायचा होता, पण दोघांनी एकमेकांकडे बघताच त्यांना हसू यायचे. अशा परिस्थितीत या चित्रपटाचे शूटिंग करणे फार कठीण झाले होते. मात्र, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर हा सीन खूप गाजला होता.

त्याच वेळी काजोलने पुढे सांगितले होते की, ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या गाण्याचे शूट करण्यास सुरुवातीला तिला खूपच अस्वस्थ वाटले. फक्त एका टॉवेलमध्ये शूट करण्याची कल्पना तिला अजिबात आवडली नव्हती. पण जेव्हा आदित्यने तिचे मन वळवले, तेव्हा तिने होकार दिला आणि शूटिंग केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: ‘डोन्ट रश’ गाण्यावर थिरकली मिथुन चक्रवर्ती यांची सून, सोबतच सहकलाकारांनीही धरला ठेका

-भर उन्हाळ्यात अभिनेत्री करतेय पूलमध्ये चिल! पाहा हार्दिक पंड्याची पत्नी नताशाच्या घायाळ करणाऱ्या अदा

-बिग बॉसची माजी कंटेस्टेंट थिरकली ‘विलायती शराब’वर; पाहा कॅनडाच्या रस्त्यावरील शहनाजचा जबरदस्त डान्स व्हिडिओ

हे देखील वाचा