बॉलिवूडमध्ये आपण चित्रपटांच्या माध्यमातून अनेक जोड्या तयार होताना बघतो. काही जोड्या एवढ्या गाजतात की त्या जोड्याच त्या चित्रपटांची ओळख बनतात. सुरुवातीच्या काळापासून बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या तयार झाली ज्यांनी केवळ त्यांच्या नावावर सिनेमाला हिट करून दाखवले. बॉलिवूडमधील अशा असंख्य जोड्यांपैकी एक असलेली जोडी म्हणजे शाहरुख खान आणि काजोल. या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले. त्यांचे जवळपास सर्वच सिनेमे सुपरहिट ठरले. या आयकॉनिक जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे नेहमीच उत्सुक असतात. आजही त्यांना सोबत बघणे म्हणजे प्रत्येकासाठीच एक पर्वणी आहे. प्रेक्षक आणि फॅन्सची हीच इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
हा सर्वच प्रेक्षकांची ऑल टाईम फेव्हरेट जोडी असणारी शाहरुख खान आणि काजोल लवकरच एका चित्रपटात सोबत दिसणार आहे. या दोघांना पुन्हा सोबत आणण्याचे काम करण जोहर करणार असून त्याच्या आगामी चित्रपटात हे दोघं सोबत दिसणार असल्याच्या बातम्या मिळत आहे. करण जोहर सध्या त्याच्या दिग्दर्शकीय ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात व्यस्त असून, या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारत आहे. याच सिनेमात शाहरुख आणि काजोल पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.
करण जोहर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर एक दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहे. मधला काळ तो एक निर्माता म्हणूनच काम करत होता. त्यामुळे हा सिनेमा त्याच्यासाठी खूपच खास असून आता त्याने शाहरुख आणि काजोलला सिनेमात कास्ट केल्यामुळे तो अधिकच खास झाला आहे. या सिनेमात जया बच्चन, शबाना आजमी आणि धर्मेंद्र हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळत असणाऱ्या माहितीनुसार लवकरच हे दोघं त्यांचे शूटिंग सुरु करणार असून त्याचे शूट मुंबईतच पार पडणार आहे.
या बातमीची अधिकृत माहिती किंवा सत्यात अजून कोणीही सांगितली नसली तरी मीडियामध्ये याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र जर ही बातमी खरी असेल तर तब्ब्ल सात वर्षांनी हे दोघं कलाकार एकत्र दिसतील. याआधी त्यांना रोहित शेट्टीच्या २०१५ साली आलेल्या ‘दिलवाले’ सिनेमात एकत्र पाहण्यात आले होते. तत्पूर्वी काजोल लवकरच दिग्दर्शक रेवती यांच्या आगामी ‘द लास्ट हुर्राह’ दिसणार आहे. तर शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘पठान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. याशिवाय तो लवकरच राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ सिनेमात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा