Saturday, June 29, 2024

‘विचार केला होता गर्लफ्रेंडसोबत चित्रपट पाहिण, पण…’, चाहत्याच्या प्रश्नाचे शाहरुखने दिले लक्षवेधी उत्तर

अभिनेता शाहरुख  खान याने नुकतंच आपला 57 वा वाढदिवस साजरी केला असून आपल्या चाहत्यांना ‘पठान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करुन सरप्राईज दिले आहे. त्यामुळे बॉलिवूडचा किंग खान मनानेही किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहात असतात. त्याच्या वाढदिवशी त्याने आपल्या चाहत्यांसोबत एक प्रश्नाचा खेळ घेतला ज्यामध्ये अनेक चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान ( Shahrukh Khan) याने आपल्या वाढदिवशी ट्वीटरवरील लाईव्ह येऊन एक क्वेशन सेशन घेतले ज्यामध्ये चाहत्यांना ‘पठाण’ चित्रपटातील प्रश्न विचारण्याला संधी मिळाली होती. या सेशनवर अभिनेता 15 मिनिटे चाहत्यांशी ऑनलाईन संवाद साधत होता. त्यामध्ये एका चाहत्याने एक प्रश्न विचारला ज्यावर अभिनेत्याने लक्ष वेधनारे उत्तर दिले आहे.

शाहरुख खानला एका चाहत्याने विचारले की, 4 वर्षानंतर पुन्हा एकदा चित्रपटामध्ये परतल्यावर काय वाटत आहे? यावर अभिनेता म्हणतो की, “मला असंच वाटत आहे जसं की, मी माझ्या घरी परत आलो आहे.” तिथेच एका युजरने लिहिले की, मला वाटलं मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत जाऊन हा चित्रपट पाहिण पण, तोपर्यत तिचं लग्न दुसऱ्यासोबत होऊन जाईल. यावर शाहरुखने देखिल भन्नाट कमेंट करत लिहिले की, “ही तर खूप दु:खाची गोष्ट आहे…पण काळजी नको करु हा चित्रपट तुला एकट्याला पाहयला देखिल चांगला वाटेल.”

चाहत्यांशी संवाद साधत असताना शाहरुखने साह्यक कलाकार जॉन अब्राहम (John Abraham) याबद्दल देखिल कौतुक करत सांगितले की, “जॉनला मी अनेक वर्षापासून ओळखत आहे. त्याच्यासोबत काम करुन खूप मजा आली.” त्यासोबत त्याने दीपिका पादुकोन (Deepika Padukone) हिचे देखिल कौतुक केले .

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुखने 2018 साली ‘फॅन’ चित्रपट केला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दणक्यात आदळला. यानंतर अभिनेत्याने थेट चार वर्षनंतर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये पाहुणा कलाकाराची भूमिका केली होती. ‘पठान’ चित्रपटानंतर त्याच्याकडे अजून चित्रपटामध्ये झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सई ताम्हरकरचा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस लुक होतोय व्हायरल…
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेच्या हातावर रंगली मेहंदी, सोशल मीडियावर फोटो होतेय तुफान व्हायरल

हे देखील वाचा