Wednesday, July 3, 2024

बॉलिवूडचा किंग खान झाला महिला क्रिकेट संघाचा मालक, ट्विट करत दिली माहिती

शाहरुख खान (Shahrukh Khan) हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि लूकमुळे शाहरुख जगभरात लोकप्रिय आहे. अनेक दशके आपल्या अभिनयाने शाहरुख खानने सिने जगतावर अधिराज्य गाजवले आहे.त्यामुळेच किंग खानच्या नावाची तुलना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये केली जाते. अभिनयाप्रमाणेच शाहरुखने खेळाच्या मैदानावरही चांगलेच नाव कमावले आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा मालक असलेल्या शाहरुख खानने आता एक महिला संघही खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे. काय आहे शाहरुख खानचा हा नवीन संघ चला जाणून घेऊ. 

अभिनय जगतात अधिराज्य गाजवणारा शाहरुख खान इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच  आयपीएलमध्ये केकेआर या संघाचा मालक आहे. आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या या संघाने आत्तापर्यंत चमकदार कामगिरी करताना दोनवेळा आयपीएलचा किताब उंचावला आहे. आयपीएलनंतर आता शाहरुख खानने नवीन महिला संघ खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे. या घोषणेनंतर शाहरुख खानची टीम आणि युएसए एमएलसी टी २० एप्रिलमध्ये ग्रेटर लॉस एंजेलेसमध्ये ते स्टेडियम तयार करण्यासाठी पुढे येणार आहे. शाहरुख खानचा हा संघ वुमेंन्स कॅरेबियन प्रिमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहे.

याबद्दलचे ट्विट शाहरुख खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन केले आहे, ज्यामध्ये त्याने ३० ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या WCPL मध्ये महिला क्रिकेट लाईव्ह पाहू इच्छिता का असे म्हणत हा आपल्या टीमसाठी आनंदाचा क्षण असल्याचे म्हणले आहे. या ट्विटमध्ये शाहरुख खानने त्याच्या नव्या महिला संघाचा म्हणजेच ट्रिबागो नाईट राईडर्सचाही उल्लेख केला आहे. शाहरुख खानची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा