Friday, April 19, 2024

शाहरुखची ‘मन्नत’ झालीय दोनशे कोटींची! एकेवेळी ‘ज्या’ घरासमोर शुट केले होते गाणे, आज आहे त्याच घराचा मालक

बॉलिवूडचा सुपरस्टार, किंग खान म्हणजेच शाहरुख खान. शाहरुखने नुकताच आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला. शाहरुखचा जन्म सन १९६५ साली नवी दिल्ली येथे झाला होता. दिल्लीवरून अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या शाहरुखने खूप मेहनत घेतली आणि चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.

भारतात लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वजण शाहरुख खानला ओळखतात. एवढंच काय अनेक आशियाई देशांत शाहरुखचा मोठा चाहता वर्ग आहे. अगदी सुरुवातीपासून कष्ट करत त्याने अनेक गोष्टी कारकिर्दीत साध्य केल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे मन्नत. त्याने आपल्या मेहनतीने मुंबईच्या वांद्रेच्या बँडस्टँड येथे  ‘मन्नत’ आलिशान घर बांधले आहे.

खरं तर शाहरुख खानचे घर चाहत्यांसाठी आकर्षणाचं ठिकाण मानले जाते. मोठ्या संख्येने चाहते त्याचे घर पाहण्यासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे या लेखात आपण मन्नत या शाहरुखच्या घराबद्दल जाणून घेणार आहोत.

शाहरुखच्या या आलिशान घराचे नाव ‘मन्नत’ आहे. हे घर शाहरुखने आपली पत्नी गौरी खानसाठी बनवले आहे. गौरी एक इंटिरियर डिझायनर आहे. गौरीने हे घर १९२० दशकाच्या हिशोबाने डिझाइन केले आहे. मन्नतला यापूर्वी ‘विला व्हिएना’ नावाने ओळखले जायचे.

‘मन्नत’मध्ये येण्यापूर्वी शाहरुख तेथेच शेजारी राहायचा. शाहरुखला फार पूर्वीपासूनच हा बंगला विकत घ्यायचा होता. मन्नतमध्येच सनी देओलच्या ‘नरसिम्हा’ चित्रपटाच्या क्लायमॅक्सची शूटिंग झाली होती. याच जागी डेविड धवन दिग्दर्शित गोविंदाच्या ‘शोल और शबनम’ चित्रपटाची शूटिंग झाली होती.

 

शाहरुखने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हा बंगला १३.३२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतला होता. शाहरुखला या घराचे नाव ‘जन्नत’ असे ठेवायचे होते, परंतु त्यानंतर त्याने ‘मन्नत’ असे ठेवले. मन्नतबद्दल बोलताना शाहरुख नेहमी म्हणतो की, “मला नेहमी असे वाटायचे की, ती जागा मुजरा सेट आहे किंवा एखाद्या खलनायकाचा अड्डा आहे.” शाहरुख खानच्या या बंगल्याचे स्ट्रक्चर विसाव्या दशकातील ग्रेड-३ हेरिटेजचे आहे. हे सगळ्या बाजूने उघडते.

मल्टीपल लिविंग एरिया, एक जिम आणि लायब्रेरी यांसारख्या अनेक सुख-सुविधांनी शाहरुखचा बंगला नटलेला आहे. या बंगल्याचे मूळ मालक गुजरातचे पारशी किकू गांधी होते. मुंबईच्या कला जगतात एक मोठे नाव असलेले किकू गांधी मुंबईच्या प्रतिष्ठित ‘शिमॉल्ड आर्ट गॅलेरी’चे संस्थापकही आहेत. शाहरुखने त्यांच्याकडूनच बंगला विकत घेतला होता.

बंगल्याच्या इंटिरियरसोबतच स्टायलिंगचे कामही स्वत: गौरीने केले आहे. ती सांगते की, “यासाठी तिला चारपेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लागला. मी प्रवास करत होते, एकेक वस्तु स्वत: आपल्या आवडीने विकत घ्यायचे आणि घराचा प्रत्येक कोपरा व्यवस्थितपणे सजवायचे. जेणेकरून सर्वकाही परिपूर्ण वाटेल.”

लिविंग जागा जितकी स्टाईलमध्ये आहे, तितकीच साधी प्रायव्हेट जागा आहे. गौरीने इथे प्रॅक्टिकल फर्निचर ठेवले आहेत. शेजारीच पुस्तकेही ठेवली आहेत आणि बोर्ड गेम खेळण्यासाठी एक जागाही आहे. इथेच कुटुंबाचे फोटो लावले आहेत. गौरीच्या काम करण्याची जागाही याच घरात आहे.

शाहरुखच्या ‘मन्नत’ घराची किंमत जवळपास २०० कोटी रुपये इतकी सांगितली जाते. मन्नत जितके आतून सुंदर आहे, तितकेच बाहेरूनही आहे. मुंबईला येणारा प्रत्येक व्यक्ती एकदा तरी मन्नतच्या बाहेर फोटो काढताना दिसतो. त्यामुळे शाहरुखच्या घराच्या बाहेर चाहत्यांची गर्दी असते.

शाहरुखने दिल्लीवरून मुंबईला येऊन टेलिव्हिजनमध्ये ‘सर्कस’ आणि ‘फौजी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. नुकतेच एका चाहत्याने शाहरुखला मन्नत विकण्याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देत शाहरुखने म्हटले होते की, “मन्नत लोकांसमोर डोके झुकवल्यावर मिळते.”

 

मन्नतसमोर एक सुंदर गार्डनही आहे, ज्यामुळे घराला आणखी सुंदरता प्राप्त होते.

वाचा-

-बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आलिशान बंगला पाहिलाय का? पाहून तुम्हीही व्हाल थक्क…

जॅकलिनने विकत घेतले प्रियांकाचे जुने घर; किंमत ऐकताच तुम्हीही हादराल

हे देखील वाचा